आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडीने जाेरदार मुसंडी मारली. आघाडीच्या तीन चाकांच्या सरकारला एक जनतेचे चाक जोडले गेले असल्याने आमची गाडी सुसाट सुरू आहे. त्यामुळे भाजपचे सत्तेचे स्वप्न साकार होणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
लासलगाव ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांच्या लोकार्पण भूमिपूजन पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते झाले. शहरात भव्य ज्येष्ठ नागरिक भवन व लोकसेवा व राज्य सेवा अभ्यासक्रमासाठी ग्रामपंचायतीने बांधलेल्या अभ्यासिकेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, अशोक होळकर, प्रांत अर्चना पठारे, गटविकास अधिकारी संदीप कराड, तहसीलदार शरद घोरपडे आदी उपस्थित होते. दीर्घायू ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने आणि राज्य शासनाच्या सहकार्याने साकारण्यात आलेले ज्येष्ठ नागरिक भवन हे राज्यातील एक आदर्श उदाहरण असून जिल्हाभरात आवश्यक त्या ठिकाणी असे ज्येष्ठ नागरिक निर्माण करण्यात येईल, असे भुजबळ यांनी सांगितले.
कोरोनाच्या काळात सुरुवातीला दर महिना साडेतीन लाख टन धान्य नागरिकांना वितरित केले जात होते. त्यानंतर त्यामध्ये वाढ करून नऊ लाख टन धान्याचे वाटप दर महिना नागरिकांना केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविकात जयदत्त होळकर यांनी लासलगाव व परिसरातील पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. सोळा गाव पाणी योजनेकरिता जलवाहिनीसाठी निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. सूत्रसंचालन डाॅ. विकास चांदर यांनी केले.
या मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास कुसुमताई होळकर, गुणवंत होळकर, शिवा सुराशे, शिवाजी सुपनर, चंद्रशेखर होळकर, कैलास सोनवणे, वेदिका होळकर, संतोष ब्रह्मेचा, दत्ता रायते, भारत कानडे, रामनाथ शेजवळ, मंगेश गवळी, ललित दरेकर, सचिन होळकर, रवी होळकर, योगेश पाटील, प्रा. किशोर गोसावी, प्रशासक सुधाकर साेनवणे, ग्रामसेवक शरद पाटील यांच्यासह मान्यवरांची या वेळी उपस्थिती होती.
ओरड करणारे अजूनही मंदिरात गेले नाहीत
मंदिरे खुली करण्यासाठी ज्यांनी आरडाओरडा केला, ते मंदिरे उघडल्यानंतर अजूनही मंदिरात गेले नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महाराष्ट्रातील मंदिरे बंद होती. ज्यांनी मंदिरे खुली करण्यासाठी आरडाओरडा केला ते लोक मंदिर उघडल्यानंतर मंदिरात अजूनही गेली नाहीत, असा टोला भाजपच्या नेत्यांना नाव न घेता भुजबळ यांनी लगावला. राजकारणाच्या वेळी राजकारण नक्की करा, असा सबुरीचा सल्ला भाजप नेत्यांना दिला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.