आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शक्तिप्रदर्शन:कारवाईची पर्वा न करता टाेकदार बाेलणारच; केंद्र सरकारकडून जे सुरू आहे ते ‘अवर्णनीय’

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारवर डागली ताेफ

जास्त बाेलल्यामुळे लाेक दुखावत गेले, राजकारणात सहन करण्याची किंबहुना प्रहार झेलण्याची क्षमता कमी हाेत चालली आहे, त्यातून उत्तर देण्यासाठी हातातील सत्तेचा गैरवापर केला जात आहे, असे सांगत राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कारवाईची पर्वा न करता मी टाेकदार बाेलणारच, असे सांगतानाच केंद्राकडून सध्या जे सुरू आहे ते ‘अवर्णनीय’ असल्याची ताेफ डागली. माझ्यावर आराेप करणाऱ्यांना मी उत्तर देणार नाही, असे सांगत त्यांनी पुन्हा शेराेशायरी करीत वेळच सर्वांना उत्तर देईल, असे सांगत अधिक बाेलणे टाळले.

भुजबळ फार्म येथे सायंकाळी साडेसहा वाजता कार्यकर्त्यांनी जाेरदार शक्तिप्रदर्शन करून भरपावसात स्वागत केले. या वेळी माजी खासदार समीर भुजबळ, विधानसभेचे प्रभारी सभापती नरहरी झिरवाळ यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित हाेते. कार्यकर्त्यांच्या स्वागतानंतर पत्रकारांशी बाेलताना भुजबळ म्हणाले की, गेल्या सहा वर्षांत कार्यकर्त्यांनी खूप काही साेसले. आम्ही तुरुंगात असताना झालेले आराेप-प्रत्याराेप, कायदेशीर कारवाईचा त्यांना त्रास झाला. त्यामुळे या सर्व आराेपातून निष्कलंक बाहेर पडणे गरजेचे हाेते. नाशिककरच नव्हे, तर आमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी तुरुंगातून बाहेर साेडले जावे यासाठी जवळपास १२ ते १३ लाख लाेकांचा काढलेला माेर्चाही विसरणार नाही, अशी पुस्ती त्यांनी जाेडली. मी जास्त बाेलत असल्यामुळे लाेक दुखावले गेले. राजकारणात अलीकडेच विचाराची लढाई करताना सहनशक्ती संपली आहे. न्यायालयात सर्व सुनावणी पूर्ण झाल्यानंतर मीडिया ट्रायल करण्याचा प्रयत्न किरीट साेमय्या यांच्याकडून झाला, मात्र आता मीडियाही हुशार झाला असून ते त्यांना फारशी जागा देत नसल्याचे भुजबळ यांनी शेवटी सांगितले.

आता भुजबळ हाेण्याची भीती नाही
‘तुम्ही सरळ वागता की भुजबळ करू?’ असा वाक्प्रचार मध्यंतरी चर्चत आला. मात्र आता किमान भुजबळ हाेण्याची भीती नसेल असा चिमटा काढला. गॅस किती स्वस्त झाला, पेट्राेल-डिझेल किती स्वस्त आहे, राष्ट्राची संपत्ती कशा कशाची विक्री करून वाढत आहे हे लाेकांना चांगले माहिती आहे. काेणी काही बाेलले तर मी टाेकदार बाेलणार, उजळपणे माझी मते मांडणारच, असाही निर्धार भुजबळ यांनी व्यक्त केला.

ईडी, पाेलिस लावून उपयाेग नाही; जनता सर्वज्ञ
ईडी, पाेलिससारख्या यंत्रणा लावून काही उपयाेग हाेत नाही, शेवटी सत्याचाच विजय हाेताे. तुम्ही फार काळ लाेकांना वेड्यात काढू शकत नाही, जनता सर्वज्ञ असून ती सर्व काही बघून निवडणुकीच्या वेळी शांतपणे उत्तर देते, असाही विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला.

काेराेनाचे नियम गुंडाळत राष्ट्रवादीचे शक्तिप्रदर्शन
काेराेनाची तिसरी लाट ताेंडावर असल्यामुळे गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत गर्दी करणाऱ्यांकडून नियम पाळले न गेल्यास कारवाईचा इशारा दिला जात असताना किंबहुना विक्रेत्यांवरही दंडात्मक कारवाई सुरू असताना जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याच भुजबळ फार्म या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गर्दीकरून जाेरदार शक्तिप्रदर्शन करीत काेराेना नियमांना तिलांजली दिल्याचा प्रकार चर्चेत आला आहे.

बातम्या आणखी आहेत...