आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक हाेते, असा दावा विराेधी पक्षनेता अजित पवार यांनी केल्यानंतर उठलेल्या वादंगाचा समाचार घेताना माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या वक्तव्याचे समर्थन करतानाच भाजपकडून राज्यपालांसह आपल्या वादग्रस्त नेत्यांनी यापुर्वी केलेल्या विधानांकडील लक्ष अन्यत्र वळवण्याची खेळी खेळली जात असल्याचा आराेप केला आहे.
यापुर्वी एका वर्गाने शिवाजी महारांजाच्या राज्यभिषेकाला विरोध केला.मग शिवाजी महाराज आमचे प्रतिपालक नाही का ?ते फक्त त्यांचेच प्रतिपालक आहे का ? असा सवाल भुजबळांनी केला आहे.
अजित पवारांचे वक्तव्य चुकीचे नाही
भुजबळ फार्म येथील पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, अजित पवार यांचे वक्तव्य चुकीचे नाही. संभाजीराजे यांनी स्वराज्याचे रक्षण केलं, म्हणून त्यांना स्वराज्य रक्षक म्हटलं. कुणाला धर्मवीर म्हणायचं असेल, तर म्हणू शकता. पवार यांचं विधान चुकीचं हाेते तर विधान सभेत त्याचवेळी लक्षात आणून देणे गरजेचे हाेते. बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण यावर विचार करायला हवा. सर्वांनी मिळून नेमका इतिहास काय हे सांगितले पाहिजे. एक एक दोन दोन पानांमध्ये मुलांना इतिहास समजतो का ? .पण काही वेळा इतिहास गाळला जातो .ही सर्वच आपली दैवतं आहे.त्यामुळे कुणी धर्मवीर म्हणा, कुणी स्वराज्य रक्षक म्हणा असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
वंचित बहुजन आघाडीला रेड कार्पेट
भुजबळ यांनी वंचित बहुजन आघाडीसाठी राष्ट्रवादीचे रेड कार्पट असल्याचे स्पष्ट केले. अनेक पक्ष एकमेकांवर टीका करीत असले तरी, निवडणुकीवेळी एकत्र येतात .शत्रूचा शत्रू तो आपला मित्र', याप्रमाणे काम चालते. उद्धव ठाकरे नाशिकमध्ये सभा घेणार असतील तर चांगलेच आहे.त्यामुळे महाविकास आघाडी मजबूत होईल असा दावाही त्यांनी केला आहे.
प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र भवन करा..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दाैऱ्यावरून भुजबळ यांनी चिमटे घेतले. देवदर्शन सुरू आहे हे चांगले आहे. कामाख्या देवीचे दर्शन घेतले. आता, काशी आहे,रामेश्वर आहे.सगळीकडे जा,अष्टविनायकाकडेही जा आणि आशिर्वाद घेवून या. महाराष्ट्र भवन देखील सगळीकडे करा असा सल्ला त्यांनी शिंदेना दिला आहे. परंतु, कामाचा झपाटा कमी होवू देवू नका असा टोला त्यांनी लगालवा आहे. मुंबई हे उद्योगपतींचे हब असून ज्याला जे न्यायचे ते न्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.