आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजोपर्यंत काँग्रेसच्या सोनिया गांधी, शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार हे एकत्र आहेत आहेत तोपर्यंत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला काेणताही धोका नाही, असे माजी पालकमंत्री व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बाेलताना स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपची बी टीम असल्याचा चव्हाण यांनी अाराेप केल्यानंतर भुजबळ हे अाक्रमक झाले. पत्रकारांशी बाेलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या चव्हाण यांनी अशा पद्धतीचे आरोप करणे चुकीचे आहे. वेगवेगळ्या विचाराचे तीन पक्ष मिळून अाघाडी स्थापन झाली. त्यामुळे थाेडेसे तरी वैचारिक घर्षण हाेणारच अाहे. संघर्षही प्रत्येक ठिकाणी सुरूच असताे मात्र नेत्यांनी अशा पद्धतीचे चुकीचे वक्तव्य होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे असेही सुनावले.
संघावर अाराेप नकाे, मात्र त्यांनी लक्ष ठेवावे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याची चर्चा असलेल्या तज्ज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्याबाबत भुजबळ यांना विचारले असता त्यांनी या प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कोणीही राष्ट्रद्रोहाचा आरोप करू शकत नाही, असे मत व्यक्त केले. ‘आरएसएस’ मध्ये आहे, असे सांगून जे काही चांगले वाईट धंदे करणारे लोक आहेत, त्यांच्यावर संघाने नजर ठेवली पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला.
कार्याध्यक्षपदासाठी अर्धा डझन सक्षम नेते
राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये राष्ट्रीय कार्याध्यक्षपद निर्माण केले जाईल या वक्तव्याबाबत बाेलताना भुजबळ म्हणाले की, तसे हाेईलच याबाबत सांगता येत नाही. मात्र तसे झाले तर किमान अर्धा डझन सक्षम नेते या पदासाठी पक्षामध्ये अाहेत. त्यात जयंत पाटील हेही भावी कार्याध्यक्ष, असू शकतील असेही सूचक वक्तव्यदेखील भुजबळ यांनी केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.