आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्राला एकत्रित ठेवण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकर हे महत्त्वाचे आहे. प्रबोधनकार ठाकरेंनी बरचसे काम फुले, शाहू,आंबेडकर यांच्यावर केले. त्यामुळे त्याचे नाव घेण्यात वावगे काय? शरद पवार हे नेहमी शिवाजी महाराजांबद्दल बोलतात, मात्र राज ठाकरे हे फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव का घेत नाही? असा सवाल राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विचारला आहे.
रत्नगिरी येथे झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी शरदचंद्र पवारांबद्दल वक्तव्य केले. त्यानंतर आज नाशिकमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर राज ठाकरे यांच्या या वक्तव्याचा छगन भुजबळ यांनी चांगलाच समाचार घेतला.
काय म्हणाले शरद पवार?
छत्रपती शिवाजी महाराज राज्यातील प्रत्येक घटकाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यक्रांती केली, त्यांनी सर्वांना सोबत घेतले. त्यांच्यानंतर फुले, शाहू, आंबेडकर यांनी सामाजिक क्रांतीच फार मोठे काम केले. म्हणून शरद पवार म्हणाले की, या महाराष्ट्राला एकत्रित ठेवण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकर हे महत्त्वाचे आहे. प्रबोधनकार ठाकरेंनी बरचसे काम फुले, शाहू,आंबेडकर यांच्यावर केले.
छगन भुजबळ काय म्हणाले?
राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले की, शरद पवारांसोबत मी गेल्या 1991 सालापासून आहे. पवार हे अनेक भाषणांत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतात, तसेच त्यांच्या इतिहासाची उजळणी देखील ते करतात.
त्या मुलाखतीत पवार म्हणाले?
गेल्या काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी पवारांची प्रकट मुलाखत घेतली त्यात त्यांनी शिवाजी महाराजांसंबंधीत प्रश्न विचारला होता. त्यावेळी पवारांनी स्पष्ट सांगितले की, ''महाराष्ट्र म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतले जाते. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील सर्व घटकांचे आहे. महाराष्ट्रात असा एकही घटक नाही जो छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर राज्यात फुले, शाहू, आंबेडकर यांच्यासारखे समाज सुधारक होऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वव्यापी होते. त्यांनी सर्व समाजाला बरोबर घेतलं असे त्यांनी यावेळी सांगितले.''
छगन भुजबळ म्हणाले की, फुले, शाहू, आंबेडकरांनी सामाजिक क्रांतीमध्ये मोठ योगदान दिले. म्हणून पवारांनी म्हटले आहे की, ''संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र ठेवण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार आवश्यक आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घटक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणे फुले, शाहू, आंबेडकर यांना मानतात. दिल्लीत आपले जे ही नेते काम करतात त्यांना दिल्लीत मराठा नेते असे म्हटले जाते. अगदी तो नेता कुठल्याही समाजाचा असला तरी..'' असे उत्तर पवारांनी राज ठाकरे यांना दिल्याची आठवण त्यांनी राज ठाकरे यांना करून दिली.
भुजबळांची राज ठाकरेंवर टिप्पणी
छगन भुजबळ म्हणाले की, प्रबोधनकार ठाकरे यांनी देखील फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार समाजापर्यंत पुस्तकाच्या माध्यमातून मांडले. ही पुस्तके माझ्या संग्रही आहे ती पुस्तके मी वाचतो. त्यामुळे राज ठाकरे यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत फुले, शाहू आंबेडकर यांचे नाव घेतले तर त्यात बिघडत कुठे अशी टिपणी देखील छगन भुजबळ यांनी यावेळी केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.