आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशरद पवार यांना जाणता राजा म्हणण्यात काय चूक आहे. आम्हाला म्हणायचा म्हणू. तुम्ही म्हणू नका. शेवटी इतिहासात लिहिले जाईल, कोणी धर्माच्या नावाने पताका फडकावल्या. कोणी सर्वांना बरोबर घेऊन विकास साधला, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी जोरदार बॅटींग केली.
छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक या मुद्यावरूनही त्यांनी अजित पवार यांची पाठराखण केली. अजित पवार यांनी महापुरुषांच्या अपमान केला नाही, पण भाजपच्या अनेक नेत्यांनी महापुरुषांना कमी लेखल्याची टीका त्यांनी केली.
मी त्याला साक्ष...
छगन भुजबळ म्हणाले की, राज्यकर्त्याला पूर्वीच्या भाषेत राजाच म्हणायचे. आणि शरद पवार हे राजकारणातून चार वेळा मुख्यमंत्री झाले. देशभरात इतर पदेही भूषविली. त्यांनी गोरगरिबांचे प्रश्न सोडवले. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले. पुणे, नाशिक, मुंबईमध्ये 80 टक्के ऑटोमाबाइल्सचे कारखाने शरद पवार यांनी आणले. उद्योगधंदा वाढवला. शिक्षणाच्या बाबतीमध्ये काम केले. मी त्याला साक्ष आहे.
ते एकच काम करायचे...
जेव्हा 1995 च्या काळात सरकार गेले तेव्हा मी शरद पवार यांच्याबरोबर फिरत होतो. उसाच्या मोळ्या टाकायला वेगवेगळ्या कारखान्यात गेलेलो. त्यावेळी ते सांगत होते, एकच काम करायचे. सगळ्या या झोपडपट्टीतल्या आपल्या गोरगरीब मुलांच्या झोपड्यांमध्ये हा कम्प्युटर खेळण्यासारखा गेला पाहिजे, अशी आठवण छगन भुजबळ यांनी सांगितली.
शिक्षण, आरक्षण...
छगन भुजबळ पुढे म्हणाले की, शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी काम केले. सामाजिक प्रश्नात किती मोठे काम केले. मंडळ आयोग, महिलांना आरक्षण दिले. सरकार गेले तरी बेहत्तर असा निर्धार करत त्यांनी बाबासाहेब आंबडेकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्याचा निर्णय घेतला. यालाच जाणता राजा म्हणतात.
त्यात चूक काय?
छगन भुजबळ पुढे म्हणाले की, जाणता राजा काय असतो? जो आपल्या जनतेबरोबर त्यांच्या प्रश्नांमध्ये एकरूप होऊन हे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवतो, तो जाणता राजा. त्यात चूक काय. त्यात तुम्हाला वाईट वाटायचे कारण नाही. आम्ही म्हणतो तुम्ही म्हणू नका. शेवटी इतिहास लिहिला जाईल. कोणी धर्माच्या नावाने पताका फडकावल्या. कोणी सर्वांना बरोबर घेऊन विकास साधल्याचेही सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.