आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंजय राऊत यांना राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे वाटते का, असा खडा सवाल सोमवारी छगन भुजबळ यांनी केला आहे. राऊतांनी एकनाथ शिंदेंच्या बॅगांवर लक्ष ठेवले असते, तर आजची परिस्थिती वेगळी असती, असा सणसणीत टोलाही त्यांनी राऊतांना लगावला.
पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत. त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला, तरी पक्ष पुढे नेईल, असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले. त्यामुळे चारेक दिवसांपूर्वी निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बुंध्यापासून हादरला. अशी टीका ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातून राष्ट्रवादी आणि पवारांवर करण्यात आली आहे. या टीकेला आता राष्ट्रवादीतून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. छगन भुजबळ म्हणाले, संजय राऊत यांना हे सगळे उकळून काढायची गरज काय, त्यांना काय अडचण आहे. त्यांना असे वाटते का की, राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे? असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला. राऊत यांनी मनभेद निर्माण करू, असा टोलाही त्यांनी लगावला.
छगन भुजबळ पुढे म्हणाले, संजय राऊत हे कोणाकोणाच्या घरात गेले होते, आणि कोणाकोणाच्या बॅगा तपासल्या हे त्यांनाच माहित. त्यांनी एकनाथ शिंदेंच्या बॅगांवर लक्ष ठेवले असते तर आजची परिस्थिती वेगळी असती. अजितदादा असतील किंवा जयंतराव आहेत ते काम करायला समर्थ आहेत. त्यांच्यावर जी जबाबदारी टाकली जाईल ते समर्थपणे पेलायला कार्यकर्ते तयार आहेत. इतरांनी त्याची काळजी करू नये.
संबंधित वृत्त
चर्चा तर होणारच:वारसदार निर्माण करण्यात शरद पवार अपयशी ठरले, राष्ट्रवादीत लोक बॅगा भरून तयारच होते; ठाकरे गटाचा थेट आरोप
पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत व त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले व त्यामुळे चारेक दिवसांपूर्वी निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बुंध्यापासून हादरला, अशाप्रकारची थेट टीका ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातून राष्ट्रवादी आणि पवारांवर करण्यात आली आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.