आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांवरील टीका प्रकरण:केतकी चितळेच्या पोस्ट मागे मनुवाद आहे का?; अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा सवाल

नाशिक8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
शरद पवारांवर टीका करणारी केतकीची फेसबुक पोस्ट
शरद पवारांवर टीका करणारी केतकीची फेसबुक पोस्ट

केतकी चितळेची पोस्ट चीड आणणारी असून यामागे कुठे मनुवाद आहे का असा सवाल अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. केतकीच्या पोस्टवरून तिच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. यात भुजबळांनी केतकीवर निशाणा साधताना म्हटले आहे की, आशा पोस्ट टाकणाऱ्यांना लाजा वाटल्या पाहिजे. अभिनेत्री असो की कुणीही अशी वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. असे छगन भुजबळांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.

नेमके काय म्हणाले मंत्री छगन भुजबळ?
लहान समाजाचे दुख: शरद पवारांनी कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांच्या व्यक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. आणि त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. इतकेच नाही तर त्यांच्या आजारावर टीका करण्यात आली असून ही बाब चुकीची आहे, असा टोला छगन भुजबळांनी केतकीला लगावला आहे.
अशा पोस्ट करणाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे, सोशल मिडियाने त्यांना कायमचे बॅन करायला हवे अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

राणांनी हनुमान चालिसेचे राजकारण करू नका - भुजबळ
दरम्यान यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी राणा दाम्पत्यावरही जोरदार टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी दिल्लीत हनुमान चालिसा पठण केले, चांगले आहे, त्यांनी पंतप्रधानांच्या घरी जात हनुमान चालिसा पठण करावे, मात्र केवळ हनुमान चालिसेवर राजकारण करू नये असा सल्ला त्यांनी राणा दाम्पत्याला दिला आहे.

सोशल मिडीयावर केतकीवर जोरदार टीका
सोशल मिडीसावर केतकीच्या पोस्टनंतर अनेकांनी तिच्या ह्या कृतीवरून तिच्यावर टीकास्त्र डागले आहेत. तिने अशी टीका करायला नको होती असे म्हणत ब्राह्मण महासंघानेही तिच्यावर टीका केली आहे. याआधीही केतकीने अशा वादग्रस्त पोस्ट आणि अक्षेपार्ह वक्तव्य केल्याने ती चर्चेत आली होती. मात्र तेव्हाही तिला सोशल मिडीयावर अनेकांनी जोरदार प्रत्युत्तर देत तिच्यावर निशाणा साधला होता.

बातम्या आणखी आहेत...