आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्रपती संभाजीराजे यांनी दिली ग्वाही:शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अग्रेसर राहणारच

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकरी, कामगार आणि सर्व स्तरांतील कष्टकरी हा महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा वर्ग आहे. त्याच्या मदतीसाठी स्वराज्य संघटना कायम अग्रेसर राहणार आहे, अशी ग्वाही छत्रपती संभाजीराजे महाराजांनी दिली. स्वराज्य संघटनेच्या शाखा उद्घाटनासाठी आले असताना छत्रपती संभाजीराजे यांनी नाशिक साखर कारखान्याला भेट दिली. या वेळी ते म्हणाले की, सर्वांचे जीवन सुखी, समृद्ध करावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नऊ वर्षांपासून बंद असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना चालू गळीत हंगामापासून सुरू होत असून ही आनंदाची बाब आहे. या कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी, कामगार, कष्टकरी जनतेची भरभराट व्हावी. कारखाना सुरळीत सुरू राहण्यासाठी खासदार गोडसे व त्यांच्या सहकाऱ्यांना मदतीसाठी आपण सदैव तयार असल्याचे सांगितले. यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत गोडसे यांना बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली तर स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते त्यांच्या बाजूने प्रचार करतील, अशी चर्चाही या निमित्ताने सुरू झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...