आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझी वसुंधरा अभियान:नाशिक जिल्ह्यातील शिरसाटे, चांदाेरी व पिंपळगाव बसवंत या तीन ग्रामपंचायतींचा रविवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माझी वसुंधरा अभियानांतर्गत जिल्ह्यातील शिरसाटे, चांदाेरी व पिंपळगाव बसवंत या तीन ग्रामपंचायतींनी सर्वाेत्कृष्ट कामगिरी केली आहे. रविवारी (दि.५) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह सरपंच, ग्रामसेवक व या अभियानात याेगदान देणाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

मुंबईतील नरीमन पाॅइंट येथील टाटा थिएटर येथे सकाळी 10:30 वाजता हा सन्मान साेहळा हाेणार आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत भूमी, जल, वायू , अग्नि व आकाश या निसर्गाशी सबंधित पंचतत्वावर आधारित जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी स्पर्धा घेण्यात आली हाेती. यात मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसाेड यांनी वैयक्तिक लक्ष घालून वेळाेवेळी आढावा घेतानाच चांगले काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना प्राेत्साहित केल्याने जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी उत्कृष्ट कामगिरी केली.

त्यात शिससाठे, चांदाेरी व पिंपळगाव बसवंत यांनी सर्वाेत्कृष्ट कामगिरी केल्याने त्यांचा गाैरव करण्यात येणार आहे. मुंबईत हाेणाऱ्या या सन्मान साेहळ्यासाठी उपमुख्यमंत्री, महसुल मंत्री, नगरविकास मंत्री, ग्रामविकास मंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री उपस्थित राहणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...