आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्याचे जलसंपदा विभागाला आदेश:''प्रस्तावित किकवी धरणासाठी येत्या बजेटमध्ये 50 कोटींची तरतूद करा''

नाशिक3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्राम्हणवाडे शिवारातील प्रस्तावित किकवी धरणाचा विषय तातडीने मार्गी लावण्याचे आदेश काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जलसंपदा विभागाला दिले आहे. येत्या बजेटमध्ये किकवी धरण उभारण्याच्या कामासाठी 50 कोटी निधीची तरतुद करण्याच्या सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जलसंपदा विभागाचे राज्याचे सचिव दिपक कपूर यांना दिल्या आहे.

मुख्यमंत्र्याच्या आदेशामुळे किकवी धरणाचे काम आता प्रत्यक्ष सुरु होणार असल्याने शहरवासियांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक – शहराचा विकास दिवसेंदिवस झपाटयाने वाढत असल्याने भविष्यात शहरवासियांना पाणीटंचाईची झळ पोहचू नये यासाठी गेल्या काही वर्षांपासून खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून सुरु असलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे बोलले जात आहे.

सध्या नाशिक शहराला गंगापूर धरणातून पिण्याचे पाणी उपलब्ध होत आहे. गंगापूर धरणाची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता सुमारे 6 टीएमसी इतकी आहे. शहराची व्याप्ती दिवसेंदिवस झपाटयाने वाढत असल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यामुळे तात्कालिन सरकारने सन 2010 मध्ये किकवी धरण प्रस्तावित केले आहे. या धरणाच्या कामासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या, मान्यता यापुर्वीच जलसंपदा विभागाला मिळाल्या आहेत. मात्र निधी उपलब्ध न झाल्याने या धरणाचे प्रत्यक्ष काम अद्यातपावेतो सुरु झालेले नाही. परिणामी धरणाचा प्रश्न प्रलंबित आहे. या धरणासाठी निधीची तरतूद होणेकामी गेल्या काही वर्षांपासून खा. हेमंत गोडसे प्रयत्नशील आहेत.

दरम्यानच्या काळात खा. हेमंत गोडसे यांनी जलसंधारण विभाग तसेच गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडे सततचा पाठपुरावा करत किकवी धरणासाठी येत्या बजेटमध्ये किमान 50 कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते.

खासदार गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आले असून मागील आठवड्यात गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिवांना किकवी धरणाविषयीचा सविस्तर अहवाल पाठवत येत्या 2022-23 च्या आर्थिक बजेटमध्ये किकवी धरणासाठी 50 कोटींची तरतूद करण्याची मागणीचे पत्र पाठविले आहे. खासदार गोडसे यांनी काल पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत मंत्रालयातील बैठकीत किकवी धरणाचा मुद्दा उपस्थित केला.

किकवी धरणासाठी येत्या बजेटमध्ये 50 कोटींच्या निधीची तरतूद करण्याची आग्रही मागणी केली. यावेळी खा. गोडसे यांनी मुख्यमंत्र्यांना किकवी धरणाचे महत्‍व लक्षात आणून दिले. शहरवासियांसाठी किकवी धरणाची असलेली गरज गोडसे यांनी मुख्यमंत्र्यांना पटवून दिली. खा. गोडसे यांची मागणी रास्त असल्याने मुख्यमंत्रांनी लगेचच जलसंपदा विभागाचे राज्याचे सेक्रेटरी दिपक कपूर यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. प्रस्तावित किकवी धरणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावा. धरणाच्या बांधकामासाठी येत्या बजेटमध्ये 50 कोटींच्या निधीची तरतूद करा अशा सूचना वजा आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी कपूर यांना दिल्या.

बातम्या आणखी आहेत...