आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री शिंदे यांची बंडखोरी गैरसमजातून..!:ते परत येतील असे वाटते; नीलम गोऱ्हे यांचा दावा; थापा यांच्या सोडचिठ्ठीवर मौन

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बंडखोरी गैरसमजातून झाली असावी, ते पुन्हा शिवसेनेत येतील असा विश्वास आज विधानपरिषद उपसभापती नीलम गोरे यांनी व्यक्त केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सावली म्हणून वावरणाऱ्या थापा यांनी शिंदे गटांमध्ये प्रवेशावर मात्र गोरे यांनी त्यांच्या पक्षप्रवेशावर मला अधिक बोलायचे नाही असे म्हणत मौन बाळगले.

शिंदेंचे मोठे नूकसान होईल
नाशिक येथे पत्रकार परिषदेत गोऱ्हे बोलत होत्या. साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या सप्तशृंगी मातेचे दर्शन घेण्यासाठी आले असून आज सायंकाळी चांदवड येथे रेणुका मातेचे दर्शन घेतले जाणार आहे.

शिंदेंचे मोठे नुकसान

निलम गोऱ्हे म्हणाल्या, शिंदे गैरसमजातून गेले असले तरी भाजपने त्यांचे प्रचंड नुकसान केलेले असेल व त्यांचा प्रभावही कमी झालेला दिसून येईल. 1995 च्या सुमारास नाशिक मधूनच 'दार उघड बये दार उघड' असे जगदंबा मातेला साकडे घातले गेले व त्यानंतर राज्यामध्ये शिवसेनेची सत्ता आली होती आता पुन्हा एकदा हाच आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. सध्याच्या सरकारवर त्यांनी टीकेची झोड उठवत वाढती गुन्हेगारी तसेच असुरक्षित महिला याविषयी नाराजी व्यक्त केली.

मंत्री गावितांकडून पांघरूण

गोऱ्हे म्हणाल्या, नंदुरबारमधील धडगाव प्रकरणामध्ये सरकार नेमके कोणाला वाचवू इच्छिते तसेच पोलिसांवर नेमका कोणाचा दबाव आहे असाही प्रश्न केला. बलात्काराचे प्रकरण दिसत असताना ही आत्महत्या आहे असा आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित कसा दावा करू शकता ? यापूर्वी गिरीश महाजन यांनीही अशीच चूक केली होती याची आठवण करून देत गावीत यांना कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी जाब विचारला पाहिजे.

शिंदेंनी 'ती' चर्चा उघड करावी

गोऱ्हे म्हणाल्या, आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेदांता प्रकल्पाच्या संचालकांशी 26 जुलै रोजी काय चर्चा केली याचा तपशील उघड करावा अशी मागणी गोऱ्हे यांनी केली. भाजप नेते आशिष शेलार यांची मनस्थिती बिघडली असल्यामुळे त्यांच्या बाबत अधिक काय बोलणार असाही चिमटा त्यांनी घेतला.

भुजबळांनी देवाबाबत असहिष्णूता ठेऊ नये

गोऱ्हे म्हणाल्या, भुजबळ यांनी शाळेमध्ये सरस्वती ऐवजी सावित्रीबाई फुले यांचे पूजन केले जावे असे वक्तव्य केल्याबाबत विचारले असता गोऱ्हे यांनी एका देवतेबाबत असहिष्णू भूमिका भुजबळ यांनी घेऊ नये.

बातम्या आणखी आहेत...