आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिकमध्ये उत्तर प्रदेशातील एक तरुण आपल्या हिंदू देव-देवतांची विटंबना करतो. पंधरवाडा उलटतो तरी ना पोलिस नाही, ना मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे सरकार कारवाई करते. इथे नाशिकमध्ये काय चालले त्यावर तुम्हाला तोडगा काढता येत नाही. अन् काश्मिरी पंडितांबाबत तुम्ही बोलता. आहो तिथ आमचे पंतप्रधान मोदी अन् अमित शाह सक्षम आहेत. तुम्ही आपल्या राज्यात काय चालले ते बघावे, अशी खरमरीत टीका आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर करताना हिंदुत्व केवळ बोलून नव्हे, तर आमच्यासारखे कृतीतून दाखवावे, असे खुले आव्हान दिले.
नाशिक येथे परप्रांतीय युवकाने शिवलिंगाची विटंबना करणारी पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित केल्यानंतर त्याच्यावर कारवाई करावी, यासाठी भाजपने शहरातून मोर्चा काढला. या मोर्चानंतर नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ठाकरेंसह आघाडी सरकार, आदित्य ठाकरे अन् संजय राऊतांवर टीकास्त्र सोडले.
बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करणार?
नितेश राणे म्हणाले, औरंगाबादचे नामांतर हे बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न होते. त्यांचेच पुत्र आता मुख्यमंत्री आहेत. मग वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचेही म्हणतात, मग तुम्हाला अडवले कोणी? करा की नामांतर अन पाठवा केंद्रांकडे प्रस्ताव. आम्ही केंद्रातून मंजुरी मिळवून देतो. पण त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी वाल्यांना विचारावे लागेल. हल्ली ते सकाळच्या गोळ्याही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारुनच घेतात. ते कुठे औरंगाबादचे नामकरण करणार. असा उपरोधित टोलाही लगावला.
मुख्यमंत्र्यांना इशारा
नितेश राणे म्हणाले की, औरंगाबादच्या उद्याच्या सभेत मुख्यमंत्री हिंदुत्वाबाबत बोलतील, पण हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा मुख्यमंत्री असताना शिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होत आहे, अशा पोस्ट व्हायरल करायला लायसेन्स दिले आहे का? असा प्रतिप्रश्न केला. करावाई करा, अन्यथा पावसाळी अधिवेशनात तुम्हाला समजेल आमचे हिंदुत्व काय असते, असा इशाराही दिला.
संजय पवार कडवट शिवसैनिक
राज्यसभेची उमेदवारी संजय पवारांना आणि राऊतांना दिली. पण ठाकरे सुरक्षित मते कुणाला द्यायला सांगतायत ते पहावे. आमदारांनाही माहित आहे, कडवट शिवसैनिक संजय पवार आहेत. राऊत नाही. संजय राऊत बाहेरून आला आहे. त्याचा काय संबध येथे. आहो हा राऊत निर्लज्ज आहे. त्याने मॉं- साहेब आणि बाळासाहेब यांच्यात वादाचा लेख लिहिला होता. अशी टीका करताना त्याला शिवसेनेचे आमदार मत देतीला का ? प्रश्न विचारुन सेफ मते संजय पवारला अन् उर्वरित राऊतला असेच होणार आहे. संजय राऊतला लीलावतीला पाठविण्याची वेळ आली आहे. पण विजय भाजपचा होईल, निकाल लागल्यावर बघा असे सूचक विधानही केले. दरम्यान शिवसेनेची अवस्था आज अशी झाली की, आमदारांना कोंडून ठेवण्याची वेळ आली. माझ्या वडिलांच्या काळात शिवसेना संरक्षण देत होती, हा फरक झाल्याचा उल्लेख केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.