आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्याधिकारी लांजेवार यांना पोलिस कोठडी:आरोग्यविभागातील सेवानिवृत्ताचे रजेचे बील मंजूरीच्या माेबदल्यात घेतली होती लाच

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आराेग्य विभागातील सेवानिवृत्ताच्या रजा राेखीकरणाचे बील मंजूर करण्याच्या माेबदल्यात 20 हजाराची लाच स्विकारल्या प्रकरणी आराेग्य उपसंचालक कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी गजानन माराेतराव लांजेवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. यानंतर गुरुवारी न्यायलायात हजर केले असता न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी त्यांना सुनावली आहे.

लाचुलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कारवाईत बुधवारी (ता. 24) दुपारच्या सुमारास संर्दभ रूग्णालयाच्या आवारातील उपसंचालक कार्यालयात हा सापळा लावण्यात आला हाेता.

एसबीच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, आराेग्य विभागातून धुळे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी पदावरून एक अधिकारी सेवानिवृत्त झाले होते. अधिकाऱ्याने उपसंचालक कार्यालयात त्याच्या कार्यकाळातील रजेच्या राेखीकरणाचे बील मंजूरीसाठी पाठपुरावा सुरू केला हाेता. सर्व कागदपत्रे व प्रक्रिया पुर्ण करूनही मुख्य प्रशासकीय अधिकारी लांजेवर यांच्याकडून बील मंजूरीसाठी टाळाटाळ केली जात हाेती.

याबाबत लांजेवर यांनी या कामाच्या माेबदल्यात 20 हजाराची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदार सेवानिवृत्त अधिकाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संर्पक साधून प्रकार कळविला. त्यानुसार बुधवारी पथकाने संर्दभ रुग्णालयात सापळा रचला, त्यानंतर नियाेजनानुसार दुपारी लांजेवार यांच्या दालनातच त्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

आणखी काही अधिकाऱ्यांचा सहभाग ?

आराेग्य उपसंचालक कार्यालय नेहमीच वेगवेगळ्या निधी खरेदी, विक्रीवरून चर्चेत असते. त्यातच थेट मुख्य प्रशासकीय अधिकारी लाांजेवार यांना लाच घेतल्या प्रकरणात अटक करण्यात आली. लांजेवार यांच्यासाेबत आणखी काही अधिकारी या प्रकरणात समाविष्ठ आहे का, याची चाैकशी एसीबीच्या पथकाकडून केली जात आहे.

निवासस्थानी झडती

वर्ग एक अधिकारी असलेले लांजेवार यांच्या नवी मुंबईतील निवासस्थानी एसीबीने रात्री झडती घेण्यात आली. मात्र, तेथे एसीबीच्या हाती काय लागले याचा तपशिल कळु शकला नाही.

बातम्या आणखी आहेत...