आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायलॉन मांजा विक्री सुरूच:नायलॉन मांजामुळे सातपूरला‎ बालक; दुचाकीस्वार जखमी‎

सातपूर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील अशोकनगरच्या जाधव संकुल‎ परिसरात दोन वेगवेगवेगळ्या घटनांत ११ वर्षीय‎ बालक व दुचाकीस्वार नायलॉन मांजामुळे‎ शनिवार (दि. ७) जखमी झाले. नशीब‎ बलवत्तर म्हणून दुचाकीस्वाराचा जीव‎ वाचला.‎याबाबात वृत्त असे की, जुनेद शेख (३०,‎ रा. सिडको) हे सायंकाळी पाचच्या सुमारास‎ दुचाकीने प्रगती शाळेजवळून घरी जात होते.‎

त्यांच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकला. हाताने मांजा काढण्याच्या प्रयत्नात शेख तोल जाऊन‎ रस्त्यावर पडले. सायंकाळी हा रस्ता अतिशय व्यस्त असतो. सुदैवाने‎ रस्त्यावर वाहतूक नसल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र यात त्यांचे दोन्ही हात‎ व पायाला गंभीर जखमा झाल्या. सामाजिक कार्यकर्ते वैभव रोंदल यांच्या‎ दुकानासमोर ही घटना घडली. त्यांनी त्वरित मदत करत शेख यांना डॉ.‎ कैलास महाजन यांच्या रुग्णालयात दाखल केले.

दुसऱ्या घटनेत जाधव‎ संकुल परिसरात सायंकाळी सहाला मैदानात खेळताना सिद्धेश जाधव (११,‎ रा. जाधव संकुल) यांच्या हातात नॉयलॉन मांजा अडकला. या घटनेत‎ त्याच्या डाव्या हाताची तीन बोटे कापली गेली. जखम इतकी गंभीर हाेती की‎ त्यावर सहा टाके घालण्यात आले. त्वरित उपचार केल्याने बोटे थोडक्यात‎ वाचली आहे. या घटनेमुळे सातपूर व शहरात नायलॉन मांजा विक्री सुरूच‎ असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. संक्रात सात दिवसांवर आली‎ असून त्याआधीच पतंग उडविण्यासाठी नायलाॅन मांजाच्या वापरामुळे‎ सातपूर परिसरात आतापर्यंत तीन-चार व्यक्ती व अनेक पक्षी गंभीर जखमी‎ झाले आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...