आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Child Marriage Free India Campaign In 100 Villages; Public Awareness Through Interaction Of Students In 100 Villages Of Tribal Taluks|marathi News

दिव्य मराठी विशेष:100 गावांत बालविवाह मुक्त भारत अभियान; आदिवासी तालुक्यांतील 100 गावांमध्ये विद्यार्थ्यांचा संवाद साधत जनजागृती

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक शहरासह ग्रामीण भागातील तसेच आदिवासी तालुक्यांमध्ये साक्षरता व जनजागृतीअभावी अजूनही बालविवाह हाेत आहेत. बालविवाहास कायद्याने बंदी असताना नाशिक िजल्ह्यातील पेठ, दिंडोरी, त्र्यंबक, हरसूल, सुरगाणा या आदिवासी भागांमध्ये अजूनही माेठ्या प्रमाणात बालविवाह होतात. या भागातील बालविवाहची प्रथा बंद करण्यासाठी तसेच आदिवासी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशनच्या सहकार्याने मदन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि मविप्र संस्थेच्या समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील १०० आदिवासी गावांमध्ये बालविवाह मुक्त भारत अभियान राबविले आहे. या अभियानाद्वारे एका विद्यार्थ्याकडून गावातील, पाड्यावरील लोकांशी संवाद साधून त्यांना बालविवाहाचे सामाजिक व इतर दुष्परिणाम, बालविवाहास असलेला कायद्याचा प्रतिबंध यांची माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. बालविवाहापासून परावृत्त करण्यासाठी १०० विद्यार्थ्यांनी १०० गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष लोकांशी संवाद साधून प्रबोधन करण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून रॅलीद्वारेही बालविवाहास प्रतिबंध असल्याचा संदेश देण्यात आला. या रॅलीत महिलांसह किशोरवयीन मुला-मुलींनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देशमुख, प्रा. सुनीता जगताप, मनीषा शुक्ल, मदन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण मदन, अॅड. विद्या चव्हाण, प्रकल्प समन्वयक गीतांजली पवार, तुषार सूर्यवंशी, मयूरी निकम, सायली बच्छाव, भक्ती बोरकर आदी उपस्थित होते.

गावांमध्ये रॅलीद्वारे जनजागृती
किशोर वय जसे हे बिघडण्याचे तसेच सुधारण्याचे असते. या वयामध्ये वेळोवेळी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. तसेच अनेक प्रश्नांचे वादळ या वयामध्ये मनामध्ये निर्माण होत असते. अशा वेळी काय करावं व काय करू नये, याबाबतीत योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे असते. या अभियानाद्वारे बालविवाहाचे दुष्परिणामांची माहिती देण्यात आली. तसेच नाशिक जिल्हातील १०० गावांमध्ये बालविवाह निर्मूलन विषयाबद्दल रॅली काढण्यात आल्या.

रॅली दरम्यान गावातील सरपंच, प्रमुख सदस्य, अंगणवाडी सेविका, बचत गटातील महिला, तरुण-युवक आणि युवतींनी प्रतिसाद देऊन सहकार्य केले. मशाल, मेणबत्ती, मोबाइलची लाइट यांचा वापर करून रॅली काढण्यात आली. तसेच रॅली दरम्यान बालविवाह निर्मूलन विषयाचे महत्त्व गावकऱ्यांना पटवून देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...