आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचलनालयातर्फे परशुराम सायखेडकर नाट्यगृहात महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन शुक्रवारी (दि. ७) झाले. पहिल्या दिवसाच्या चारही नाटकांत बाल कलाकारांनी सामाजिक व पर्यावरण विषयांवर आधारित संहितेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. शालेय विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी संधी शासनाने या स्पर्धेतून दिली आहे.
त्यांच्या या कला व अभिनय पाहण्यासाठी शहरातील शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना बालनाट्य स्पर्धेत पाठवावे, असे आवाहन मनपा शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी केले. यावेळी नाट्य परिषद, नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, मनपा शिक्षणाधिकारी सुनीता धनगर, नाशिक केंद्राचे समन्वयक राजेश जाधव, सहसमन्वयक मीना वाघ उपस्थित होते. एक नाटक रद्द झाल्यामुळे पाचपैकी एकूण चार नाटके सादर झाली. रंगकर्मी थिएटर्स, नाशिकच्या वतीने ‘जीर्णाेद्धार’ हेे संध्या कुलकर्णी लिखित व सिद्धी बोरसे दिग्दर्शित नाटक सादर झाले. श्री स्वामीनारायण इंग्लिश मीडियम स्कुल पंचवटी यांनी ''पुन्हा नको रे बाबा'' नाटक सादर केले. जंगल वाचवा, प्राणी वाचवा असा संदेश या नाटकातून देण्यात आला. श्री सप्तशंृगी शिक्षण संस्था पंचवटीचे ''वारी'' हे नाटक सादर करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.