आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाट्याविष्कार:नाट्य स्पर्धेतून बहरली बाल रंगभूमी; 18 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालनाट्य स्पर्धेतून मुलांवर कलेचे संस्कार घडत असल्याने पुढे जाऊन अनेक चांगले कलाकार निर्माण होतील. अशा स्पर्धांतून त्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल, असा विश्वास ज्येष्ठ कलाकार रवींद्र ढवळे यांनी व्यक्त केला.

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित १८ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी रविवारी (दि. २०) मार्च रोजी प. सा. नाट्यगृहात पार पडली. नाशिक केंद्रावरील या फेरीत पाच बालनाट्य सादर करण्यात आली. या स्पर्धेच्या उद‌्घाटनाप्रसंगी ढ‌वळे बोलत होते. याप्रसंगी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष रवींद्र कदम, कार्यवाह सुनील ढगे आदी उपस्थित होते. यावेळी रवींद्र कदम यांनी सांगितले की, १८ वर्षांपूर्वी तत्कालीन सांस्कृतिक मंत्री रामकृष्ण मोरे यांनी बालनाट्य स्पर्धा सुरू करून चांगला पायंडा पाडला. या स्पर्धेच्या निमित्ताने कलाकारांची चांगली पिढी घडू शकली. अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. रंगकर्मी थिएटर्सतर्फे "जंगलातील दूरचा प्रवास' हे नाटक सादर झाले. त्यानंतर दि नाशिक सेंट झेविअर्स सोसायटीतर्फे "धमाल बच्चे कंपनी' तर नाट्यसेवा थिएटर्सतर्फे "तुला इंग्रजी येतं का?' तर सचिन शिंदे अॅकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट‌्स संस्थेतर्फे "ध्येयधुंद’ आणि कृपा शैक्षणिक सामाजिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे "समज' अशी पाच बालनाट्य सादर झाली.

मुलांना समज देणारे नाट्य..
पूनम पाटील लिखित समज हे बालनाट्य दूर्वाक्षी पाटील यांनी दिग्दर्शन केले. प्रशांत चौधरी यांची निर्मिती तर चैतन्य गायधनी प्रकाशयोजना, प्रतीक गुंजाळ संगीत, नकुल चौधरी वेशभूषा, पूनम पाटील रंगभूषा, दूर्वाक्षी पाटील नेपथ्य, श्वेता लासुरे यांनी रंगमंच व्यवस्था तर स्वरा कुलकर्णी, स्नेहा गायकवाड व अर्थ आहेर आदी कलाकारांनी भूमिका केल्या.

धमाल बच्चे कंपनी...
कोरोनात भोंदुबाबाच्या उपायाने अनेक लोक गमावले. शास्त्रीय दृष्टीने निर्णय घेणे आजच्या काळाची गरज आहे, यावर या नाटकातून प्रकाशझोत टाकण्यात आला. रमेश रोहोकले यांनी नाटकाचे लेखन तर ज्योती कदम यांनी दिग्दर्शन केले. प्रकाशयोजना रामनाथ खालकर, नेपथ्य प्रमिला तुपे, रंगभूषा मोनिका सॅन्टीयागो, संगीत ब्रायइटसन कोचाट, वेशभूषा भारती चाबुकस्वार यांची होते. आर्यन काळे, रेणुका मोगल, आर्यन पवार, इशना माहिरे, श्रेयांश गिरमरकर, कार्तिक रायते, युवराज्ञी जोशी, आयुष आव्हाड, संपदा पोतदार, क्रिस्टिनो कोचाट आदींनी भूमिका साकारल्या.

ध्येयाच्या दिशेने उडणारा ज्यो...
ज्यो या पक्षाची उंच भरारी घेण्याचे स्वप्न गरुडामुळे पूर्ण होते. ध्येयाच्या दिशेने जिद्दीने जाण्याचा संदेश ध्येयधुंद या नाटकातून देण्यात आला. राजीव पाटील लिखित या नाटकाचे क्षमा देशपांडे यांनी दिग्दर्शन केले आहे. चेतन बर्वे नेपथ्य, प्रणव सपकाळे प्रकाशयोजना, श्रीराम वाघमारे वेशभूषा, सिद्धी भरत संगीत, माणिक कानडे रंगभूषा तर आर्घ्या नाशिककर, श्यामली राठोड, प्रांजल सोनवणे आदींनी भूमिका केल्या.

बातम्या आणखी आहेत...