आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासार्वजनिक वाचनालय बालभवन आणि नगरसेविका प्रा. डॉ. वर्षा भालेराव यांच्या संयुक्त विद्यमाने वाचनालयाच्या गो. ह. देशपांडे उद्यान शाखेत महिलांसाठी पारंपरिक वेशभूषेत रॅम्प वॉक, मेंदी, रांगोळी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत जवळपास ८० ते १०० महिलांनी सहभाग नोंदविला. याचे वैशिष्ट्य म्हणजे वयाच्या ७२ वर्षांच्या आजीबाईंनी हेल्मेटचे महत्त्व समजावून दिले. त्याचप्रमाणे विविध संदेश रांगोळी स्पर्धेतून महिलांनी दिले. या स्पर्धेचे परीक्षण पूजा गायधनी, स्नेहल कासार, सविता ताडगे यांनी केले.
यावेळी डॉ. सुजित कौर बावा यांनी महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर विजेत्यांना माजी आमदार निशिगंधा मोगल, नगरसेविका भालेराव, अनिल भालेराव, वाचनालयाचे कार्याध्यक्ष संजय करंजकर, प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, अर्थसचिव उदयकुमार मुंगी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.