आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत मराठी सिनेमाचा झेंडा:मानवअधिकार आयोगाचा राष्ट्रीय पुरस्कार 'चिरभोग' मराठी लघुपटाला जाहीर

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नीलेश आंबेडकर यांची सलग दुसऱ्यांदा वर्णी

राष्ट्रीय मानव अधिकार आयोग आयोजित 8 व्या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत निलेश आंबेडकर यांच्या चिरभाेग या मराठी लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. दिल्लीत होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात सलग दुसऱ्या वर्षी वर्णी लागल्याने मराठी लघुपटाचा दिल्लीतही डंका वाजला आहे.

दोन लाख रुपये, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

जातनिहाय व्यवसायावर प्रकाश

हा लघुपट एका मुलाचे समाजात जात आणि जातीनिहाय व्यवसायावर आधारित सतत भेदभाव, हक्क सुनिश्चित करण्यासाठी सिद्धांत आणि व्यवहारातील विरोधाभास उघड करणारा व त्या मुलाच्या अपमानास्पद संघर्षांवर प्रकाश टाकतो. या लघुपटाची निर्मिती राहुल सोनावणे आणि निलेश आंबेडकर यांनी केली आहे.

राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष श्री. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पूर्ण आयोगाने, सदस्य डॉ. ज्ञानेश्वर एम. मुळे आणि श्री. राजीव जैन यांचा समावेश करून पुरस्कारप्राप्त चित्रपटांची निवड केली.

वास्तववादी विषयांची हाताळणी

"चिरभोग" या लघुपटाची कथा निलेश आंबेडकर यांनी लिहिली असून, पटकथा आणि संवाद संजय भारतीय यांनी लिहिले आहेत. राजवीर परदेशी, सुकेशिनी कांबळे, सुशीलकुमार शिर्के, सोपान भोईर, राहुल बनसोडे, सचिन धारणकर आणि राहुल सोनवणे यांनी यात प्रमुख भूमिका केल्या आहेत..

दिग्दर्शक नीलेश आंबेडकर वास्तववादी विषय निवडतात आणि नीलेश आंबेडकरांच्या समाजात बदल घडवून आणण्याच्या दृष्टीकोनातून आलेल्या प्रतीकांचा वापर करून ते मनोरंजक, पण अप्रत्यक्षपणे पडद्यावर सादर करतात. मागील वर्षी ही त्यांच्या "मुंघ्यार" या कलाकृतीला राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचा पुरस्कार मिळाला होता. या वर्षी सलग दुसर्यांदा हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

123 लघुपट होते रिंगणात

एनएचआरसीचे लघुपट पुरस्कार योजनेचे उद्दिष्ट मानवी हक्कांच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी सिनेमॅटिक आणि सर्जनशील प्रयत्नांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना मान्यता देणे हे आहे. एकूण १२३ लघुपट पुरस्कारासाठी रिंगणात होते.