आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रकर्मी पुस्तकाचे प्रकाशन:पुस्तक हा ऐवज अनमोल ठेवा; अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कुठलाही कलावंत जातो,तेव्हा दीड दिवस सोशल मीडियावर हळहळ व्यक्त होते परंतू दिग्गज कलावंतांचे कार्य एवढे महान असते की,आपण कायमच त्याची जाणीव ठेवायला हवी.त्यांच्या आयुष्य वाचतांना एक वेगळी प्रेरणा मिळते.त्यामुळे अशा दिग्गज कलावंतांच्या आयुष्यावर आधारित असणारे लेखक आशिष निनगुरकर लिखित चित्रकर्मी हे पुस्तक अनमोल ऐवज आहे" असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केले.

मेडवर्ल्ड आशिया इंटरनॅशनल आणि श्रद्धा फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित चित्रकर्मी या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त कोर्टयार्ड मेरियट हॉटेलमध्ये

आयोजित कार्यक्रमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी बोलत होत्या.लेखक-कवी-गीतकार-पटकथाकार आशिष निनगुरकर यांच्याचित्रकर्मी"या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.यावेळी व्यासपीठावर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्यासोबत अभिनेत्री प्रार्थना बेहरे,ज्येष्ठ पत्रकार डॉ.राहुल रनाळकर,पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य सागर वैद्य,आयोजक डॉ.मोतीलाल तायडे व लेखक आशिष निनगुरकर उपस्थित होते.

कार्यक्रमात सोनाली कुलकर्णी बोलत होत्या, ''चित्रकर्मी' या पुस्तकातून रसिकप्रिय असणाऱ्या दुर्गा खोटे,राजा परांजपे,शरद तळवलकर, गणपत पाटील, डॉ. श्रीराम लागू, रमेश देव, श्रीकांत मोघे, निळू फुले, प्रभाकर पणशीकर, खेबुडकर, प्रा.मधुकर तोरडमल, विनय आपटे, लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, स्मिता पाटील, सतीश तारे आणि राजीव पाटील आदी दिग्गज ३० कलावंताचा वेध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या कलावंतांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.पण दुर्देवाने आज कुठलाही कलावंत आपल्यात नाही याचे दुःख फार मोठे आहे. तरी त्यांच्या कलेतून,भूमिकांमधून, कलाकृतीमधून व सामाजिक कार्यातून ते आपल्यातच जिवंत आहेत असे वाटते. त्यांचे कार्य अनमोल आहे. ते मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आशिष यांनी या पुस्तकातून केला आहे.अत्यंत साध्या शब्दांत त्यांनी दिग्गज कलावंतांचा हा प्रवास मांडला आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचनीय रसिकप्रिय होईल यात शंका नाही.

अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांनी 'चित्रकर्मी' पुस्तकाचे कौतूक करून या पुस्तकाच्या निमित्ताने अनेक दिग्गज कलावंतांची माहिती रसिकांना मिळेल असा आशावाद व्यक्त केला. मेयर मेडी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल पुरस्कार देखील प्रदान करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल अमृतकर तर आभार डॉ.मोतीलाल तायडे यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...