आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सार्थ निवड:83 व्या जूनियर व युथ राष्ट्रीय टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेसाठी चोपडा, कोटेचा व वाणी महाराष्ट्र संघात

नाशिक13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केरळ येथे होणाऱ्या 83 व्या जूनियर व युथ राष्ट्रीय टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेसाठी नाशिकच्या तनिशा कोटेचा, सायली वाणी व कुशल चोपडा यांची महाराष्ट्र संघात निवड झाली. या वर्षी कुशल चोपडा यांची 15,17 व 19 वर्षाखालील वयोगटातील महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. एका सिझनमध्ये तीन संघात निवड झालेला नाशिकचा पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे.

कुशल हा 15, 17 व 19 वर्षाखालील वयोगटात महाराष्ट्रात अनुक्रमे प्रथम, दूसरा व चौथा मानांकित खेळाडू आहे. तर राष्ट्रीय स्तरावर त्याला 15 वर्षा खालील गटात तीसरे मानांकन आहे. तसेच आंतराष्ट्रीय स्तरावर कुशलला 176 वे मानांकन आहे. यावर्षी तनिशा कोटेचा व सायली वाणी यांची महाराष्ट्राच्या 17, 19 व महिला गटाच्या संघात निवड झाली. एका सिझनमध्ये तीन-तीन संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या दोघी नाशिकच्या पहिल्या महिला खेळाडू आहेत. तनिशा ही सध्या राज्यात 17 व 19 वयोगटात अनुक्रमे दूसऱ्या व तीसऱ्या स्थानावर असून तर राष्ट्रीय स्तरावर चौथ्या व पाचव्या स्थानावर आहे.

सध्या ती जागतिक क्रमवारीत अनुक्रमे त्रेचाळीस व सत्याहत्तर स्थानावर आहे. सायली वाणी हीला 17 व 19 वयोगटात महाराष्ट्रात अनुक्रमे तीसरे व दूसरे मानांकन असून, राष्ट्रीय स्तरावर अनुक्रमे बत्तीस व चोवीसावे मानांकन आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सायलीला अनुक्रमे 86 व 139 हे मानांकन आहे. तनिशा कोटेचा हीने नुकत्याच दोहा, ऑस्ट्रीया, जर्मनी व स्पेन येथे झालेल्या डब्ल्यूटीटी युथ कंडेंडर स्पर्धेत भाग घेतला होता. सायली वाणी हीने 2021 मधे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत 15 वर्षाखालील वयोगटात अजिंक्यपद मिळविले होते.

प्रशिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार

तसेच सायलीने युथ जागतिक अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या संघाचे प्रतिनिधित्व करुन ब्रॉझ पदक पटकावले होते. याशिवाय सायली ही नुकत्याच जर्मनी व स्पेन येथे झालेल्या डब्ल्यूटीटी यूथ कंडेंडर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाली होती. नुकत्याच ऑस्ट्रीया येथे झालेल्या 15 वर्षाखालील वयोगटात कुशल हा डब्ल्यूटीटी युथ कंडेंडर स्पर्धेत सहभागी झाला होता. त्यामध्ये त्याने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. तिन्ही खेळाडू प्रशिक्षक जय मोडक यांचे मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. या तिन्ही खेळाडूचा व त्यांच्या प्रशिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे जनरल सेक्रेटरी नामदेव शिरगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी नाशिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड यांनी स्वागत केले. यावेळी उपाध्यक्ष मिलिंद कचोळे, सचिव शेखर भंडारी, राजेश भरवीरकर, अभिषेक छाजेड, हेमंत पाटीलआदि मान्यवर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...