आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:आयएमएत अध्यक्षपदासाठी चुरस‎

नाशिक‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडीयन मेडिकल असोसिएशन‎ नाशिक शाखेच्या कार्यकारी मंडळाचा‎ कार्यकाळ १५ मार्चला संपत निवडणूक‎ प्रक्रिया राबविली जात आहे.‎ आयएमएच्या इ तिहासात यंदा प्रथमच‎ अध्यक्षपदासाठी पाच इच्छुकांनी अर्ज‎ दाखल केले आहेत. दरम्यान, गुरुवारी‎ (दि. ९) अर्जांची छाननी होणार आहे‎ तर शुक्रवारी (दि. १०) अर्ज माघारीचा‎ दिवस आहे. शनिवारी (दि. ११)‎ उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली‎ जाणार आहे.‎ आयएमएचे शहरात दोन हजारांवर‎ सभासद आहे. आयएमएच्या‎ सध्याच्या कार्यकारी मंडळाचा‎ कार्यकाळ संपला आहे.

१८ जागांसाठी‎ १७ अर्ज दाखल केले असल्याने‎ निवडणूक अविरोध झाली असून,‎ आहे. एका जागेसाठी अखेरच्या‎ दिवसापर्यंत अर्ज दाखल नसल्याने या‎ जागेवर निवडून आलेल्या सदस्यांच्या‎ सर्वानुमते नियुक्ती दिली जाणार आहे.‎ अध्यक्षपदासाठी डॉ. सुचेता बच्छाव,‎ डॉ. कविता गाडेकर, डॉ. विशाल‎ पवार, डॉ. सुधीर संकलेचा आणि डॉ.‎ किरण शिंदे यांनी अध्यक्षपदासाठी‎ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. १५‎ मार्च रोजी १२ ते सायं. ५ वाजेपर्यंत‎ आयएमए येथे मतदान होणार असून,‎ त्याच दिवशी सायंकाळी ५.३० वाजता‎ मतमोजणी होणार आहे. निवडणूक‎ निर्णय अधिकारी म्हणून डॉ. मंगेश‎ थेटे, डॉ. महेश मालू, डॉ. श्रद्धा‎ वाळवेकर काम पहात आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...