आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिकमधील सिडको प्रशासकीय कार्यालय सुरूच राहणार असल्याचा शासनाने निर्णय घेतला असून सिडको वासीय, राजकीय पक्ष, सामजिक संघटना यांच्या लढ्याला यश आले आहे. कार्यालय सुरू राहताना पुन्हा एकदा नागरिकांची आर्थिक पिळवणूक होणार नाही अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
शासनाने सिडकोच्या नवी मुंबई येथील व्यवस्थापकीय संचालक यांना पत्र पाठवले. व त्यात आवश्यक कर्मचारी ठेवून कार्यालय सुरु ठेवण्याचे, इतर अधिकारी, कर्मचारी, विशेषतः तांत्रिक संवर्ग, यांना आवश्यकतेनुसार इतरत्र पदस्थापना देण्याचे आदेश दिले आहे. कार्यालय सुरु राहणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
व्यवस्थापकीय संचालक यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सिडकोचे नाशिक येथील कार्यालय बंद करुन तेथील अधिकारी, कर्मचारी यांची इतरत्र रिक्त पदांनुसार पदस्थापना देणेबाबत कळविण्यात आले आहे. सिडकोने भाडेपट्टयाने दिलेल्या जमिनी, लिज होल्ड ते फ्री होल्डसम करण्याची व इतर अनुषंगिक बाबींची कार्यवाही अद्याप प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर बाब विचारात घेता, संदर्भाधीन पत्रामध्ये सुधारणा करुन आपणास कळविण्यात येते की, सदर कामाकरीता आवश्यक असणारा कमीत कमी लिपीक वर्गीय कर्मचारी वर्ग नाशिक कार्यालयात कायम ठेवावा. अन्य अधिकारी कर्मचारी विशेषतः तांत्रिक संवर्ग, यांना आवश्यकतेनुसार इतरत्र पदस्थापना देण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीबाबत शासनास अवगत करावे असे आदेश दिले आहेत.
गेल्या आठवड्यामध्ये अचानक सिडको प्रशासकीय कार्यालय बंद करण्यात येत असल्याचे शासनाच्या गृहनिर्माण विभागाकडून काढण्यात आले होते या आदेशाचे परिपत्रकही प्रसिद्ध करण्यात आल्याने सिडकोतील सर्वच राजकीय पक्षांनी हा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यामध्ये राज्यातील शिंदे सेना व भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत सिडको बचाव समिती स्थापन करण्यात आली या समितीच्या सर्व पक्ष सदस्यांनी तातडीने राज्य शासनाने हा निर्णय त्याचा घर विचार न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पुन्हा एकदा बुधवारी 9 नोव्हेंबरला नव्याने आदेश काढून नाशिक मधील सिडको प्रशासकीय कार्यालयातील आवश्यक तेवढे तांत्रिक व इतर कर्मचारी नियुक्त करण्याचे अधिकाऱ्यांना इतरत्र मुक्ती देण्याचे आदेश परिपत्रक काढले आहे. या नव्याने घरी झालेल्या परिपत्रकानुसार सिडको बचाव समितीचा राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आनंदोत्सव साजरा केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.