आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:सिडको कार्यालयप्रश्नी मुख्यमंत्र्यांना साकडे

सिडकोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक येथील सिडकोचे प्रशासकीय कार्यालय बंद न करण्यासाठी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच साकडे घालण्यात आले आहे. हे कार्यालय बंद झाल्यास नागरिकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागणार असल्याने याबाबत आमदार व खासदारांची मुख्यमंत्री कार्यालयात सोमवारी तातडीची बैठक हाेणार आहे.

महापालिका क्षेत्रात सिडकोने ६ गृहनिर्माण योजनेंंतर्गत अंदाजे २५ हजार सदनिका बांधल्या असून ५ हजार वेगवेगळया वापरांचे भूखंड वाटप केलेले आहेत. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी अंदाजे १५ हजार टपरी भूखंडदेखील वाटप केलेली आहेत.

आमदारांना महत्त्व नाही का?
शासन सिडको कार्यालय बंद करण्याचे आदेश काढते आणि स्थानिक आमदारांना याची थोडीदेखील कल्पना नसते. म्हणजे आमदारांना महत्त्व नाही का? शासनाचा आदेश आमदारांना माहीत नसणे ही शोकांतिका म्हणावी लागेल. - संतोष सोनपसारे, जिल्हाध्यक्ष, महात्मा फुले समता परिषद

शासननिर्णय एकतर्फी
सिडको कार्यालय बंद करण्याचा शासनाचा निर्णय एकतर्फी आहे. सिडको महामंडळ आणि महाराष्ट्र शासन यांचा समन्वय दिसून येत नाही. औरंगाबाद येथील मिळकती औरंगाबाद महापालिकेकडे नाशिक महापालिकेप्रमाणेच हस्तांतर केलेल्या आहे. तेथील कार्यालय बंद केलेले नाही. - तानाजी जायभावे, माजी नगरसेवक

सिडकोच्या मिळकती यांमध्ये सिडकोने वाटप केलेल्या सदनिका, वेगवेगळ्या वापराचे भूखंड, टपरी भूखंड, मिळकतीलगतच्या लहान जागा इत्यादींचा समावेश होतो.पाच हजार भूखंडांमधील निवासी तथा व्यापारी आणि वाणिज्य भूखंडांवर बांधलेल्या अपार्टमेंट, फ्लॅट, रोहाउस, कार्यालय, ऑफिस, दुकाने या वेगळ्या आहेत.

अशाप्रकारे सिडको अधिसूचित क्षेत्रामध्ये अंदाजे ५० हजार मिळकती असून त्यांच्याबाबत कोणतेही काम करावयाचे असल्यास त्यासाठी सिडको कार्यालयात नागरिकांना जावे लागते. सिडको प्रशासकीय कार्यालय बंद करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. हा आदेश त्वरित रद्द करून कार्यालय पूर्ववत सुरू ठेवून सुमारे तीन लाख सिडकोवासीयांना दिलासा द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

दिलेला आदेश निषेधार्थ
५२ वर्षांपासून सिडकोचे कार्यालय आहे. इतर फी कमी करण्याची अपेक्षा असताना कार्यालय बंदचा निर्णय निषेधार्थ आहे. - सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना

तत्काळ निर्णय घ्यावा
आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे की, सिडको प्रशासकीय कार्यालय बंद करू नये. ३ ते ५ लाख सिडकोवासीयांचा प्रश्न सोडवावा. - प्रवीण तिदमे, महानगरप्रमुख, बाळासाहेबांची शिवसेना

बातम्या आणखी आहेत...