आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकतर्फी प्रेमातून तरुणाने बळजबरीने तरुणीच्या घरात घुसून तिच्या भावाच्या गळ्याला चाकू लावत तिचे अपहरण केले. निर्जनस्थळी तिला नेत लग्नाचा तगादा लावला पण तिने लग्नाला नकार देताच बेदम मारहाण करत तिला गंभीर जखमी केले. हा गंभीर प्रकार शनिवारी (ता. 5) रात्री पंचवटी परिसरात घडला.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि पिडीत तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, राज पोपट मते (वय 22) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात रविवारी (ता. 5) रोजी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरी आला अन् जबरदस्ती घेऊन गेला!
तरुणी घरी असताना संशयित राज मते हा बळजबरीने घरात शिरला. तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, असे बोलत पीडित तरुणीचा हात पकडून तिला बाहेर ओढले. तरुणीच्या भावाने तिला सोडवण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने तरुणीच्या भावाच्या गळ्याला चाकु लावत बळबजरीने दुचाकीवर बसवून रामशेज किल्ला जवळ एका निर्जनस्थळी घेऊन गेला.
लोखंडी कड्याने केली मारहाण
तु सोबत आत्ताच्या आता लग्न आपण दोघे लग्न करुन गुजरातला पळून जाऊ असे बोलला. पीडित तरुणीने नकार दिल्यानंतर संशयिताने तिला खाली पाडून बेदम मारहाण केली. हातातील लोखंडी कड्याने तरुणीच्या डोक्यावर तोंडावर मारुन गंभीर जखमी केले. पिडीतेच्या डोक्यात आणि तोंडातून रक्त आल्यानंतर दिंडोरी येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेले. दवाखान्यात गाडीवरुन पडलो असल्याचे डाॅक्टरांना सांग अशी धमकी दिली.
पीडितेने डाॅक्टरांना खरा प्रकार सांगीतला. तीच्या कुटुंबियांना फोनद्वारे माहिती दिल्यानंतर कुटुंबियांना तीची सुटका केली. पोलिसांत तक्रार दिली. वरिष्ठ निरिक्षक डाॅ.सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.