आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आराेप:सिटीलिंक कर्मचाऱ्यांचे आंदाेलन; 21 बस डेपाेतच

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरी प्रवासी वाहतूक करणाऱ्या सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यांनी दाेन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याचा आराेप करत शुक्रवारी (दि. २) आंदाेलन केले. या आंदाेलनामुळे सकाळी तपाेवन डेपाेतील विविध मार्गावर धावणाऱ्या २१ बसेस रद्द झाल्या. अचानक या बस रद्द झाल्याने नियमित कर्मचारी, विद्यार्थ्यांना माेठ्या अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान दुपारनंतर ताेडगा निघाल्याने बसेस सुरळीत झाल्या.

महापालिकेच्या सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यांना दाेन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याने त्यांनी आंदाेलन पुकारले. दाेन महिन्यांपूर्वीही असेच आंदाेलन पुकारले हाेते.कर्मचाऱ्यांनी अचानक केलेल्या या आंदाेलनामुळे तपाेवन डेपाेत एकच गाेंधळ उडाला हाेता. राेज तपावेन डेपाेतून विविध मार्गावरून १३८ बसेस धावत असतात. मात्र कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदाेलनामुळे २१ बसेस धावू शकल्या नाही. वेतनप्रश्नी याबाबत अनेकदा मागणीकरूनही ताेडगा निघत नसल्याने कर्मचाऱ्यांनी आंदाेलन केले. पगार मिळाला नाही तर राजीनामा घ्यावा अशी मागणी आंदाेलकांनी केली. मात्र आंदोलन केल्याने प्रशासनाने दहा हजारांपर्यंत दंड ठोठावल्याचे देखील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

वेतनाबाबत आश्वासन दिल्याने आंदाेलन मागे कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. आयुक्तांसाेबत झालेल्या बैठकीत चर्चा झाली. शनिवारी याबाबत ठाेस निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिल्याने आंदाेलन मागे घेण्यात आले. - सुमित देवरे, सिटीलिंक श्रमिक कामगार सेना, अध्यक्ष

ठेकेदारांना दंड करणार वेतनाचा प्रश्न हा ठेकेदारासंदर्भात आहे. तर बसफेेऱ्या रद्द झाल्याने ठेकेदारास नाेटीस बजावणार असून दंड देखील करण्यात येणार आहे. - मिलिंद बंड, व्यवस्थापक, सिटीलिंक

बातम्या आणखी आहेत...