आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरी प्रवासी वाहतूक करणाऱ्या सिटिलिंकच्या कर्मचाऱ्यांनी दाेन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याचा आराेप करत शुक्रवारी (2 डिसेंबरला) आंदाेलन पुकारले हाेते.
कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदाेलनामुळे सकाळी तपाेवन डेपाेतील विविध मार्गावर धावणाऱ्या 21 बसेस रद्द झाल्या. या प्रकारामुळे प्रवाशांसह कर्मचारी, विद्यार्थ्यांना माेठ्या अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान दुपारनंतर या वेतनप्रश्नाबाबत ताेडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर बसेस सुरळीत सुरू झाल्या.
महापालिकेच्या परिवहन महामंडळाच्या वतीने सिटीलिंकच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक केली जाते. वेतन मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांनी दाेन महिन्यापूर्वी आंदाेलन पुकारले हाेते.त्यानंतर पुन्हा शुक्रवारी वाहक आणि चालकांनी आंदाेलनाचे अस्त्र उगारले.सकाळी कर्मचाऱ्यांनी काम बंद करत वेतनाची मागणी केली. कर्मचाऱ्यांची अचानक केलेल्या या आंदाेलनाचमुळे तपाेवन डेपाे एकच गाेंधळ उडाला हाेता. राेज तपावेन डेपाेतून विविध मार्गावरुन 138 बसेस धावत असतात.मात्र कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदाेलनामुळे तब्बल 21 बसेस धावू शकल्या नाही. विशेष म्हणजे आंदाेलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दंडाचा बडगा देखील उगारण्यात आलेला आहे.
आंदाेलनकर्त्यांना दंडाचा दणका
शहर प्रवासी वाहतूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनबाबतच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहे. दाेन महिन्यापासून पगार मिळालेला नाही. अद्यापपर्यंत दिवाळीचा बाेनस न मिळाल्याने कर्मचाऱ्यांचा अडचणीचा सामना करावा लागत आहे. याबाबत अनेकदा मागणीकरुनही ताेडगा निघत नसल्याने कर्मचाऱ्यांनी आंदाेलन केले. पगार मिळाला नाही तर राजीनामा घ्यावा अशी मागणी आंदाेलन कर्त्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली. मात्र आंदोलन केल्याने प्रशासनाने दहा हजारांपर्यंत दंड ठोठावल्याचे देखील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
ठेकेदारांना दंड करणार
वेतन मिळत नसल्याची तक्रार करत काही कर्मचाऱ्यांनी आंदाेलन केले. मात्र वेतनाचा प्रश्न हा ठेकेदारासंदर्भात आहे.तर बस फेेऱ्या रद्द झाल्याने ठेकेदारास नाेटीस बजावणार असून दंड देखील करण्यात येणार आहे.
- मिलिंद बंड, व्यवस्थापक, सिटिलिंक
वेतनाबाबत आश्वासन दिल्याने आंदाेलन मागे
कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. आयुक्तासाेबत झालेल्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. शनिवारी याबाबत ठाेस निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिल्याने आंदाेलन मागे घेण्यात आले.
- सुमित देवरे, सिटी लिंक श्रमिक कामगार सेना , अध्यक्ष
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.