आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडचणीत वाढ:पाेस्ट ऑफिस ते सेठी कंपाउंड येथील खड्ड्यांमुळे नागरिक हैराण

नाशिक21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाेस्ट ऑफिसपासून ते सेठी कंपाउंंड, बस वर्कशाॅपपर्यंतच्या खड्ड्यांमुळे परिसरातील नागरिक, व्यावसायिक, वाहनचालक हैराण झाले आहेत. या भागात काही दिवसांपूर्वी गॅस पाइपलाइनसाठी खड्डे खाेदण्यात आले हाेते. त्यातील अनेक खड्डे आजही तसेच आहेत.

तर एका बाजूचे खड्डे बुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न झाला आहे. मात्र ते डांबरीकरणही सपाट न करता खडतर झाल्याने अडचणीत वाढच झाली आहे. या रस्त्यावर वाहने पडण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. या रस्त्याच्या बाबतीत महापालिकेकडे तक्रार करूनही दुर्लक्ष हाेत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...