आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा सुरळीत:सणासुदीत पाणीपुरवठा सुरळीत झाल्याने नागरिकांत समाधान

नाशिक/ सातपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठवड्यापासून शहरात पाणीपुरवठ्याचा खेळखंडाेबा झाल्यानंतर रविवार, साेमवारी अर्ध्या नाशकात पाण्याचा ठणठणाट हाेता. यावर सातपूर परिसरात गळती झालेली जलवाहिनी पपया नर्सरीजवळ क्रॉस कनेक्शन व दोन्ही व्हॉल्व्ह जोडणी दुरुस्ती पूर्ण केल्यानंतर मंगळवारी (दि ३०) शहरात पाणीपुरवठा सुरळीत झाला. सणासुदीत तरी पाणी मिळाल्याने महिलांमध्ये समाधान आहे. सातपूरसह सिडकाे आणि पश्चिम नाशिक विभागातील नागरिकांना गेल्या आठवड्यासापूस पाणीटंचाईला सामाेरे जावे लागले. आता मात्र दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्याने मंगळवारी कुठेही टँकरची गरज भासली नाही.

सिमेंट पाइपचे काम सुरू
अमृत गार्डनजवळ १२०० मिमी व्यासाच्या सिमेंट पाइपलाइन दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी पाणीपुरवठा स्टोअरमध्ये असलेल्या १२०० मिमी व्यासाची २५फूट रुंद एमएस पाइपलाइन,उपयुक्त साहित्य, जॅक मिळाल्याने या ठिकाणी येत्या तीन-चार दिवसांत काम पूर्ण करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...