आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टवाळखाेरांचा वावर:पुष्पउद्यानात ठिकठिकाणी कचरा,नियमित स्वच्छता करण्याची नागरिकांची मागणी

इंदिरानगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकमधील एकमेव पुष्पउद्यानाची निर्मिती झाली पण सध्या या उद्यानाकडे संबंधितांचे दुर्लक्ष झाल्याने प्रेमीयुगुलांसह मद्यपी टवाळखोरांचा अड्डा या उद्यानात तयार झाला आहे.मनसेने मोठा गाजावाजा करत नाशिकमधील एकमेव दुर्मिळ पुष्पांचे उद्यान साकारले. नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे हे उद्यान ठरले. या उद्यानात सध्या मोठ्या प्रमाणात पालापाचोळा साठला आहे. उद्यानाचे प्रवेशद्वार २४ तास उघडे असल्याने दुचाकी थेट उद्यानात नेऊन टवाळखोर बसतात. प्रेमीयुगुलांचा मोठ्या प्रमाणात येथे वावर वाढला असून ते अश्लील चाळे करताना दिसतात.

त्यांना कोणी हटकले तर अर्वाच्च भाषेत ते बाेलतात. उद्यानाच्या स्वच्छतेची जबाबदारी असलेला ठेकेदारही वरवर पालापाचोळा साफ करताे आणि उद्यानाबाहेर पालापाचोळा जमा करताे. मनपाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. या उद्यानातील झाडांची छाटणी करण्यात यावी तसेच कुंपणाची उंची वाढवावी, अशी मागणी होत आहे. सध्या प्रशासन राजवट असल्याने माजी नगरसेवकाचे लक्ष वेधले गेले आहे. या उद्यानातील ट्रॅकवर फक्त मुरुम टाकला आहे. त्यावर पेव्हर ब्लॉक बसवावेत, स्वच्छता करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...