आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त कार्यक्रम:सायक्लोथॉन आणि ओपन स्ट्रीटद्वारे नागरिकांनी लुटला आनंद

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधत केंद्र शासनाच्या स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंज आणि सायकल फॉर चेंज अंतर्गत स्मार्ट सिटी काॅर्पाेरेशनच्या वतीने रविवारी (दि. 4) सायक्लोथॉन आणि ओपन स्ट्रीट कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात माेठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नाेंदवत आनंद लुटला.

या कार्यक्रमामध्ये पहिल्या टप्प्यात सायक्लोथॉन रॅली सकाळी 6 वाजता वाजता गोदा पार्क येथून सुरू झाली . त्यानंतर रॅली रामवाडी-घारपुरे घाट-अशोकस्तंभ-मॅरेथॉन चौक-गंगापुर नाका-जेहान सर्कल-पाईपलाईन सिग्नल-सोमेश्वर मंदिर-बारदान फाटा-नवश्या गणपती व परत मॅरेथॉन चौक येथे समाराेप करण्यात आला.या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात ओपन स्ट्रिट इव्हेन्ट हा अभिनव उपक्रम मॅरेथॉन चौक ते केकाण हॉस्पीटल ह्या स्मार्ट सिटी मार्फत पुनर्विकास झालेल्या स्मार्ट रस्त्यावर आयोजित करण्यात आला .

यामध्ये लहान मुलांसह त्यांच्या पालकांचा समावेश होता. 100 मीटर मॅरेथॉन, 300मीटर मॅरेथॉन , हॉपस्कॉच, तीनपायांची शर्यत, सॅक रेस असे विविध खेळ या वेळी घेण्यात आले. प्रत्येक वयोगटासाठी एक विशिष्ट स्पर्धा आयोजित करण्यात आली. विशेष म्हणजे ही स्पर्धा फक्त मुलांसाठी नसून ती त्यांच्या पालकांसाठी देखील घेण्यात आलाी.यावेळी अ‍ॅड. दत्तात्रेय चकोर यांनी सायकल आणि पर्यावरणाचे संरक्षण व जतन याबाबत कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन केले. त्याच प्रमाणे नाशिक शहरातील हवामान बदलावर एनआयुए फेलोद्वारे कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यशाळामध्ये शहराच्या बदलत्या हवामानाविषयी आणि स्मार्ट सिटी अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या हवामान प्रकल्पांविषयी माहिती देण्यात आली. आगामी काळात या प्रमाणे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेही स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी यावेळी सांगितले. उपक्रमास आयोजन करण्यात आले. स्मार्टसिटीचे महाव्यवस्थापक स्थापत्य दिग्विजय पाटील, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर माने,स्मार्ट सिटी इंटर्न, शालेय विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...