आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाॅंग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते कश्मीर भव्य पदयात्रा सुरू केली आहे. 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल झालेल्या यात्रेच्या समर्थनार्थ नाशिक शहरात कृती कार्यक्रम घेणेसंबंधी विस्तृत चर्चा करण्यात आली. यावेळी सर्वानुमते दि. 14 नोव्हेंबर (पं. नेहरू जयंती) ला संत गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, नाशिक येथे सायंकाळी 4 वाजता नागरीक सभा आयोजित करण्यात आली आहे.
भारत जोडो यात्रा ही सुमारे 3500 हजार किलोमीटरची आहे, यात मोठ्या संख्येने सर्व थरातील नागरिकांचा उस्फूर्त पाठींबा मिळत आहे. महाराष्ट्रातील सर्व पुरोगामी जनसंघटना, नागरीक, कार्यकर्ते यांच्या सिव्हिल सोसायटीने देखील सक्रिय सहभाग नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवार दि. 8 रोजी, सायंकाळी हुतात्मा स्मारक येथे जनसंघटना पदाधिकारी व प्रतिनिधींनी राजू देसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेचा देशभरात उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे ठिकठिकाणी केंद्र सरकारच्या विरोधात नागरिकांकडून जाहीर प्रतिक्रिया व्यक्त करीत संताप व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये विविध पुरोगामी संघटनांकडून अभ्यास समर्थन दिले जात आहे. त्यानिमित्तानेच नागरिक सभा घेण्याचे करण्यात आले आहे.
अनेक नागरिक व सामाजिक संघटना पुरोगामी विचाराचे लोकांकडून राहुल गांधी यांच्या यात्रेत प्रत्यक्ष सहभागी होता येत नसले तरी त्यांना समर्थन देण्यासाठी एकत्रित येऊन त्यांना पाठिंबा दिला जाणार आहे या निमित्ताने नाशिक मध्ये समाविचारी पक्ष संघटनांचे पदाधिकाऱ्यांचे बैठक देण्यात आली.
यावेळी ज्ञानेश्वर काळे, रमेश साळवे, मनोहर आहिरे, नितीन मते, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, निशिकांत पगारे, निसारभाई पटेल, इसाकभाई कुरेशी, अशोक शेंडगे, डाॅ.महेंद्र नाकिल, समाधान बागूल, कल्याणी आहिरे, भुषण काळे, प्रविण जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन मनोहर आहिरे तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर काळे यांनी मांडले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.