आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनाच्या विराेधात घाेषणाबाजी:गतिराेधकासाठी नागरिक रस्त्यावर

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मध्यवस्तीत असलेल्या व नवीन वसाहती निर्माण झालेल्या कर्मयोगीनगर, गोविंदनगर, उंटवाडी परिसरात वाढत्या अपघातांच्या घटना लक्षात घेता आर.डी. सर्कलसह परिसरातील चाैकांमध्ये तातडीने गतिरोधक बसवावेत या aप्रमुख मागणीसह इतर समस्या मांडत या परिसरातील रहिवाशांनी थेट रस्त्यावर उतरून आंदाेलन केले. आर. डी. सर्कल येथे प्रशासनाच्या विराेधात घाेषणाबाजी करत मागणीकडे लक्ष वेधले.

सत्कार्य फाउंडेशनच्या पुढाकाराने बुधवारी हे आंदाेलन झाले. याची पालिका अधिकाऱ्यांनी दखल घेत तातडीने कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. सिटी सेंटर माॅल ते गाेविंदनगर रस्त्यावरील आर. डी. सर्कल या चाैकाला लागून असलेल्या कर्मयोगीनगर कॉर्नर येथील जॉगिंग ट्रॅकच्या सुशोभीकरणाचे काम हाेत नाही, उद्यानात कचऱ्याचे साम्राज्य असल्याने दुर्गंधी पसरली आहे.

नयनतारा इमारतीसमोरील रस्ता दुभाजक काढून भुजबळ फार्मकडे सरळ मार्ग करावा, खड्डे बुजवून रस्त्यांचे डांबरीकरण करावे, सर्कलवरून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांवर नियमित कारवाई व्हावी, या ठिकाणी वाहतूक पाेलिस नियुक्त करावा, गतिराेधक बसविण्यात यावे, या मागण्यांचे निवेदन पालिकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले हाेते. तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड, बाबासाहेब गायकवाड, शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, प्रभाकर खैरनार, धवल खैरनार, संगीता देशमुख, संध्याछाया ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव देवरे, बापूराव पाटील, विनोद पोळ, नीलेश ठाकूर, अशोक गाढवे, राजमाता जिजाऊ हास्यक्लबच्या छाया नवले, भारती देशमुख, रंजना सुर्वे, वंदना पाटील, शीतल गवळी, वृषाली ठाकरे, सुरेखा बोंडे, सरिता पाटील, कुमुदिनी फेगडे, संगीता चोपडे, रुही राजहंस, यशोदा अमृतकर आदींनी आंदाेलन केले. नियोजित जॉगिंग ट्रॅकवर घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली. या आंदाेलनाची माहिती मिळताच बांधकाम उपअभियंता हेमंत पठे, जगदीश रत्नपारखी यांनी आश्वासन आंदोलकांना दिले. रास्ता रोकोचा निर्णय मागे घेण्यात आला. समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...