आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबड मधील वाढत्या गुन्हेगारीने नागरिक हैराण:स्वतंत्र पोलिस ठाण्याची मागणी, नाशिक ते मुंबई काढणार पायी मोर्चा

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड पोलिस स्टेशनच्या हद्दीत सततच्या वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांनी नागरिक हैराण झाले असून अंबड औदयोगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण व्हावे यासाठी नाशिक ते मुंबई मंत्रायल असा पायी मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती माजी नगरसेवक राकेश दोंदे, सामजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर, रामदास दातीर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अंबड गाव, अंबड औद्योगिक वसाहत, चुंचाळे, दत्तनगर, घरकुल आदी परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अंबड पोलिस ठाण्याचे विभाजन करून अंबड औद्योगिक वसाहतीत स्वतंत्र पोलिस ठाण्याची निर्मिती करावी ही अनेक वर्षांची मागणी आहे. ती पूर्ण करावी यासाठी, स्थानिक नागरिकांसह नाशिक ते मुंबई पायी मोर्चा काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार आहे.

स्वाक्षऱ्यांचे उद्दीष्ट पूर्ण

या निवेदनासाठी नागरिकांची स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली असून वीस हजार स्वाक्षरी झाल्या असुन 100 टक्के नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे उद्दीष्ट पूर्ण करून येत्या 8 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9 वा. पदमोर्चाला सुरुवात केली जाणार आहे. शनिवार दि.8 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वा. कारगिल चौक येथून प्रस्थान, पाथर्डी फाटा येथे छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मुंबईकडे रवाना होतील.

आदींचा सहभाग

सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर रामदास दातीर, माजी नगरसेवक राकेश दोंदे संदीप नाठे, हेमंत जाधव यांच्या नेतृत्वाखाली नाशिक ते मुंबई पदमोर्चा काढण्यात येणार आहे. या मोहिमेत साहेबराव दातीर, रामदास दातीर, खंडेराव दातीर, राकेश दोंदे, विक्रम दातीर, अरुण दातीर, नितीन दातीर, मनोज दातीर, महेश दातीर, सचिन इंगोले, विजय चौधरी, शांताराम फडोळ, शरद कर्डिले, रवि दातीर, सागर शिरसाठ, त्र्यंबक मोरे, आदींसह शेकडो ग्रामस्थ सहभागी होणार आहेत.

पोलिसांच्या निष्क्रियतेवर संताप

या भागात गुन्हेगारीच्या मोठ्या घटना घडूनही अंबड पोलिस कारवाई करण्यात कुचराई करत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. येथील वरिष्ठ निरीक्षक सक्षम नसतानाही पोलीस आयुक्त याकडे लक्ष देत नसल्याने आशर्य व्यक्त होत आहे. याबाबत सर्व प्रकार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे कथन केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...