आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा:सिव्हिल सर्व्हिसेस पूर्व परीक्षा २०२२; यूपीएससीच्या नागरी सेवा पूर्व परीक्षेला दोन हजार 601 परीक्षार्थींची दांडी

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय लोकसेवाआयोगातर्फे रविवारी (दि. ५) जूनला सिव्हिल सर्व्हिसेस पूर्व परीक्षा २०२२ (नागरी सेवा) घेण्यातआली. या परीक्षेसाठी शहरातील १९ केंद्रांवर व्यवस्था करण्यातआली होती. सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत पहिला पेपर तर दुपारी २. ३० ते ४.३० या वेळेत दुसरा पेपरची परीक्षा झाली. युपीएससी परीक्षेचे नाशिकमध्ये केंद्र झाल्यानंतर यावर्षी दुसरी परीक्षा पार पडली.

रविवारी घेण्यातआलेल्या नागरी सेवा पूर्व परीक्षेची काठिण्य पातळी मागील परीक्षांच्या तुलनेत जास्त नसल्याची परीक्षार्थींनी सांगितले. या पूर्व परीक्षेला एकूण ६ हजार १९८ परीक्षार्थींपैकी ३५९७ उमेवारांनी परीक्षा दिली तर २६०१ परीक्षार्थी गैरहजर राहिले. पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्य परीक्षा होईल. मुख्य परीक्षेचे केंद्र मुंबई येथे असून मुख्य परीक्षेच्या निकालानंतर मुलाखतीसाठी पात्र ठरतील.

नाशिकमध्ये यूपीएससी परीक्षेचे केंद्र झाल्यानंतर पहिल्या वर्षी विद्यार्थी संख्या कमी असली तरी यंदा मात्र ६ हजार १९९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदा परीक्षा केंद्रांची संख्याही यावर्षी वाढली. यूपीएससीतर्फे घेण्यातआलेली सिव्हिल सर्व्हिसेस पूर्वी परीक्षा २०२२ सर्व केंद्रांवर सुरळित पार पडली. १९ केंद्रांवर ६ हजार १९८ उमेदवारांपैकी पेपर एकला २५६० तर पेपर दोनला २६०१ उमेदवारांनी दांडी मारली. यूपीएससी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी परीक्षेच्या पूर्वसंध्येला परीक्षा केंद्रांना भेट देऊन तयारीचाआढावा घेऊन नियोजन केले होते. जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसह ५५० कर्मचाऱ्यांनी परीक्षेचे नियोजनाचे काम पाहिले.

नासकात केंद्र झाल्याने परीक्षार्थींना फायदा
यूपीएससी परीक्षेचे केंद्र नसल्याने मुंबई, पुणे या शहरांत परीक्षा देण्यासाठी जावे लागत होते. परंतु,आता नाशिकमध्ये केंद्र सुरू झाल्याने परीक्षार्थींना फायदा होत असून वेळेची बचत होते. नाशिकमधील केंद्रांवर धुळे, जळगावसह इतर शहरांतील परीक्षार्थीही प्रविष्ट झाले होते. पूर्व परीक्षेची काठिण्य पातळी मागील परीक्षांच्या तुलनेत कमी होती.
-प्रमोद मटाले, परीक्षार्थी

बातम्या आणखी आहेत...