आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाणामारी:सराईत गुन्हेगारांत हाणामारी; एक गंभीर जखमी

नाशिक5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुने नाशिक परिसरात नानावली रस्त्यावर राेमवारी (दि. ७) रात्री ११ वाजता तिघा सराईत गुंडांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. गुंडांनी हत्याराचा वापर केल्याने तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. जुने नाशिकमधील नानावली सुन्नी चौक ते ट्रॅक्टर हाउसकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्रीच्या सुमारास काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे टोळके नेहमीप्रमाणे उभे होते. यावेळी त्यांच्यात आपापसांत शाब्दिक वाद झाले. हा वाद हाणामारीपर्यंत पोहाेचला. तेथेच पडलेले दगड, फरशांचे तुकडे एकमेकांना मारत या गुंडानी हैदोस घातला. यावेळी एकाने त्याच्याजवळ असलेल्या हत्याराने वार केले.

यामुळे विनोद श्रीकृष्ण चौधरी ऊर्फ इल्या हा गंभीर जखमी झाला आहे. तसेच तडीपार गुंड किशोर बाबूराव वाकोडे, ऋषभ दिनेश लोखंडे ऊर्फ डुबऱ्या हे दोघेही जखमी झाले आहेत. संशयित ऋषभ याची काही दिवसांपूर्वी तडिपारीची मुदत संपली आहे, असे पोलिसांनी सांगितले. या तिघांमध्ये नेमके कोणत्या कारणांवरून वाद झाले हे रात्री उशिरापर्यंत समजू शकलेले नव्हते. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे मात्र परिसरात भीतीचे वातावरण पसरले हाेते. या परिसरात पाेलिसांची गस्त कमी असल्याचा आराेप यावेळी परिसरातील नागरिकांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...