आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजन:पदवीसाठी वर्ग १५ ऑगस्टनंतरच; केटीएचएमचे येत्या आठवड्यात तर एचपीटीच्या वर्गांना त्यानंतर मुहूर्त

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारावीच्या निकालास उशीर झाल्याने आणि पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा अजूनही सुरू असल्याने बी.ए., बी.एस्सी. आणि बी.काॅम. हे पदवी प्रथम वर्षाचे वर्ग सुरू होण्यास विलंब होत आहे. प्रत्येक महाविद्यालयाने त्यासाठी नियोजन केले असून, केटीएचएम महाविद्यालयाचे वर्ग येत्या आठवड्यात तर एचपीटी आर्टस‌् आणि आरवायके सायन्स महाविद्यालयांतील वर्ग सुरू होण्यास स्वातंत्र्य दिन उजाडणार आहे.

कोरोनानंतर परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय झाल्यानंतर त्या जुलै महिन्यापासूनच सुरू कराव्यात अशा शासन आदेशाने विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी त्यानुसार नियोजन केले. परिणामी अजूनही पदवीच्या परीक्षा सुरू आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर प्रवेशप्रक्रियेवर तर होतच आहे. पण, या परीक्षांमुळे महाविद्यालयांचे वर्गही बुक आहे. त्यामुळे बारावी उत्तीर्ण झालेल्या प्रथम वर्ष पदवीला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे वर्ग अद्यापही सुरू झालेच नाहीत. केटीएचएम महाविद्यालयाने बी.ए., बीसीए आणि बी.एस्स्सी. बायोटेक या अभ्यासक्रमांचे वर्ग सुरू केले आहेत. बी.काॅम., बी.एस्सी.चे वर्ग मात्र पुढील चार ते पाच दिवसांत सुरू करणार असल्याचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी सांगितले. एचपीटी आणि आरवायके महाविद्यालय बी.ए. आणि बी.एस्सीचे वर्ग १५ ऑगस्टनंतर सुरू करणार असल्याचे प्राचार्य. प्रा. व्ही. एन. सूर्यवंशी यांनी सांगितले. यादरम्यान बीवायके महाविद्यालयाचेही प्रथम वर्ष पदवीचे प्रवेश सुरू होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...