आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वछता मोहीम:ओझर नगरपरिषदेकडून बाणगंगा नदीत स्वच्छता; मुख्याधिकारी किरण देशमुख यांचे नागरीकांना आश्वासन

ओझर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओझर नगरपरिषद हद्दीतील बाणगंगा नदी व नदी परिसराची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. कार्यालयीन कर्मचारी २५ व सफाई कर्मचारी परिसरानुसार वेगवेगळे गट तयार करण्यात आले. त्याकरिता दोन ट्रॅक्टर, एक छोटा हत्ती इत्यादी वाहनांच्या सहाय्याने बाणगंगा नदीचे दशक्रिया विधी शेड, भीम गर्जनानगर ते मारुती मंदिर जवळील पूल, वीट भट्टीपर्यंत साफसफाई करण्यात आली. ४ फेऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली व २ फेऱ्या छोटा हत्ती भरून कचरा नदीपात्रातून काढण्यात आला. मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी यानंतरही नियमित नदी पात्राची स्वच्छता करण्याचे आश्वासन देत यासाठी नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...