आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:स्वच्छता माेहिमेत 100 किलाे कचरा संकलित

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वत हातात खराटा घेत संत गाडगे महाराजांनी समाजाला स्वच्छतेचा संदेश दिला हाेता. संत गाडगे महाराजांची २१ डिसेंबरला पुण्यतिथी असल्याने द्वारका परिसरातील संत गाडगे महाराज वसाहतीत रहिवाशांनी रविवारी (दि. १८) स्वच्छता माेहीम राबवली. या माेहीमेत १०० किलाे कचरा संकलित करत परिसर स्वच्छ केला. या स्वच्छता माेहिमेच्या माध्यमातून संत गाडगे महाराजांच्या कार्याचे या निमित्ताने स्मरण करण्यात आले.

आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकांची जबाबदारी आहे. हीच जबाबदारी नागरिकांच्या मनात रुजविण्यासाठी संत गाडगे महाराज स्वत: हातात खराटा घेत रस्ता झाडत असत. या माध्यमातून त्यांनी अनेकांमध्ये स्वच्छतेची बीजे रुजवली हाेती. आजच्या काळातही प्रत्येकाने संत गाडगे महाराजांचे विचार आत्मसात करण्याची गरज निर्माण झाली आहे. संत गाडगे महाराजांच्या कार्याचा, विचाराचा प्रचार व्हावा या उद्देशाने रविवारी संत गाडगे महाराजांच्या पुण्यतिथीचे आैचित्य साधत ही स्वच्छता माेहीम राबविण्यात आली.

द्वारका परिसरातील संत गाडगे महाराज वसाहत परिसरात दुपारी ४ च्या सुमारास ही माेहीम राबवण्यात आली. या माेहिमेच्या माध्यमातून परिसरातील प्लास्टिक पिशव्या,कचरा संकलित करण्यात आला. िवशेष म्हणजे या स्वच्छता माेहिमेत महिलांसह चिमुकल्यांची संख्या लक्षणीय हाेती. आपला परिसर स्वच्छ राहिला तर शहर आपाेआप स्वच्छ हाेईल, असा संदेश या निमित्ताने देण्यात आला.

नियमित स्वच्छता माेहीम राबविण्यात येणार
संत गाडगे महाराजांनी सांगितलेला विचार पुढे नेण्यासाठी तसेच पुढच्या पिढीमध्ये स्वच्छतेचे महत्त्व रुजविण्यासाठी परिसरातील रहिवाशांकडून नियमित स्वच्छता माेहीम राबवली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...