आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात अशासकीय लिपिक व टंकलेखक पद भरावयाचे आहे. त्यासाठी जिल्ह्यातील पात्र माजी सैनिकांनी २८ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले यांनी केले आहे.अशासकीय लिपिक नि टंकलेखक पदासाठी सशस्त्र दलात किमान १५ वर्षे सेवा झालेली असावी. मराठी टंकलेखनाचा वेग दर मिनिटास ३० शब्द असल्याचे वाणिज्य प्रमाणपत्र असावे तसेच महाराष्ट्र शासनाची एमएससीआयटी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
इच्छुक माजी सैनिकांनी अर्जासोबत माजी सैनिक ओळखपत्र, मराठी टंकलेखन प्रमाणपत्र,संगणकाचे एमएससीआयटी प्रमाणपत्र, इत्यादी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहेत. परिपूर्ण अर्ज २८ डिसेंबरपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नाशिक येथे काळजीपूर्वक सादर करावेत, असेही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात अनेक दिवसांपासून भरतीची प्रतीक्षा हाेती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.