आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान:मराठवाड्यात चटका; विदर्भात ब्रह्मपुरीचा पारा 44.4 अंशांवर, महाबळेश्वरला सुखद गारवा; @ 24.8 अंश

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात, राजस्थान आणि विदर्भामध्ये उष्णतेच्या लाटेमुळे कमाल तापमान गुरुवारी ४० ते ४५ अंशांदरम्यान राहिले. मात्र दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात काही भागांत अंशत: घसरण झाली आहे. राज्यात महाबळेश्वर येथे गुरुवारी सर्वात कमी २४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर, सर्वाधिक तापमान विदर्भात ब्रम्हपुरी येथे ४४.४ अंश इतके नोंदवले गेले.

गुरुवारी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील दोन ते तीन शहरे वगळता अन्य भागात कमाल तापमानात घसरण झाली होती. ढगाळ वातावरण असल्याने दिवसभर नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागला. तर कोकणात कमाल तापमान कमी झाल्याने गारवा होता.

प्रमुख शहरांतील तापमान
ब्रह्मपुरी ४४.४, अकोला ४३.६, जळगाव ४३.५, नांदेड ४३.४, परभणी ४३.२, अमरावती ४२.४, नागपूर ४१.९, यवतमाळ ४१.५, औरंगाबाद ४१.४, बुलडाणा ४१.४, सोलापूर ३९.१, नाशिक ३६.२.

बातम्या आणखी आहेत...