आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिकचे वातावरण आता उष्ण होत असून पारा देखील चाळिशी पार होत आहे. झपाट्याने वाढणाऱ्या शहरीकरणामुळे वातावरणात बदल घडून येत आहे. नाशिकची ओळख गोदावरी नदीमुळे निर्माण झाली आहे. त्यामुळे गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक नाशिककरांचे कर्तव्य आहे. गोदावरी, पाऊस व जीवन हे समीकरण बिघडल्याने वातावरणात बदल घडताना दिसत आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ शिल्पा डहाके यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रवादी अर्बन सेलच्या वतीने प्रा.डॉ.शिल्पा डहाके यांचे गोदावरी नदी विषयीचे व्याख्यान राष्ट्रवादी भवन येथे आयोजित केले होते. व्याख्यानासाठी कार्यकर्त्यांनी एक दिवस सायकलीचा वापर करून पर्यावरण विषयक जनजागृती केली. अर्बन सेलचे राहुल खालकर व डॉ.मृगाक्षी क्षीरसागर यांनी आयोजन केले होते. यावेळी डॉ. डहाके म्हणाल्या की, झपाट्याने वाढणारे शहरीकरण बदलता येणार नाही, परंतु नागरिकांनी आपले राहणीमान पारंपरिक पद्धतीने करावे. नदीमध्ये सोडण्यात येणारे सांडपाणी तातडीने थांबवून त्यावर प्रक्रिया करून त्या सांडपाण्याचा पुनर्वापर करावा.
यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, सुषमा पगारे, सुरेखा निमसे, जगदीश पवार, अनिता भामरे, अंबादास खैरे, राहुल तुपे, मंगेश लांडगे, संजय खैरनार, डॉ.मृगाक्षी क्षीरसागर, राहुल खालकर, डॉ.अमोल वाजे, किशोर शिरसाठ, जीवन रायते आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.