आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Clinchit To Savannah 4 Directors; The Decision Of The Charity Commissioner Was An Allegation Against The Office Bearers Of 10 Years Ago| Marathi News

प्रतिक्रिया:सावाना ४ संचालकांना क्लिनचिट; धर्मादाय सह आयुक्तांचा निर्णय १० वर्षापूर्वीच्या पदाधिकाऱ्यांवर हाेता  आराेप

नाशिक16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सार्वजनिक वाचनालयाच्या २०१२-२०१७ या कार्यकारी मंडळातील पदाधिकाऱ्यांच्या विराेधात श्रीकांत बेणी यांनी ४१ डी अंतर्गत दाखल केलेले प्रकरण धर्मादाय सह आयुक्तांनी आराेप सिद्ध हाेत नसल्याचे स्पष्टीकरण देत साेमवारी (दि. १) निकाली काढल्याचे सावानाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांनी सांगितले. दरम्यान, तक्रारकर्ते बेणी यांनी अद्याप निकालपत्र मिळाले नसल्याने काेणतेही भाष्य करणे उचित ठरणार नसल्याची प्रतिक्रिया दिली.

सावानाच्या २०१२-२-१७ या काळातील कार्यकारिणीविराेधात बेणी यांनी सेवाकर, अग्निशमन यंत्रणेतील दाेष आणि नवीन सभासद हाेण्यापासून वाचकांना राेखल्याच्या संदर्भात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली हाेती. त्यावर वेळाेवेळी सुनावणी हाेऊन प्रकरणाचा निकाल तत्कालिन पदाधिकारी जयप्रकाश जातेगावकर, अॅड. अभिजित बगदे, गिरीश नातू आणि देवदत्त जाेशी यांच्या बाजूने लागला. या प्रकरणात नावे आैरंगाबादकर, माजी उपाध्यक्ष किशाेर पाठक, सरल धारणकर यांचे निधन झाल्यानंतर त्यांची नावे आपाे आपच वगळली गेली. तर वेदश्री थिगळे, मिलिंद जहागिरदार, स्वानंद बेदरकर, विनया केळकर, सुरेश गायधनी, नंदन रहाणे पुढील कार्यकारिणीत नसल्याने त्यांचीही नावे आधीच वगळण्यात आली हाेती. खटल्यात तत्कालिन चार पदाधिकारी उरले हाेते. त्या चाैघांच्या बाजूने धर्मादाय सह आयुक्त टी. एस. अकाली यांनी निकाल दिल्याचे प्रा. फडके यांनी सांगितले. प्रकरणातील पदाधिकाऱ्यांच्या बाजूने अॅड. अतुल गर्गे यांनी काम बघितले.

बातम्या आणखी आहेत...