आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किमान तापमानात घसरण:शहरात ढगाळ वातावरण, थंडीचा कडाका मात्र कायम

नाशिकराेड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात दोन दिवसापासून किमान तापमानात घसरण झाल्याने थंडीचा कडाका हा वाढला होता. मात्र रविवारी ढगाळ वातावरण असल्याने किमान तापमानात वाढ झाली असली तरीही गारठा कायम होता. शहरवासीयांना रविवारी दिवसभर उबदार कपडे परिधान करून फिरावे लागत होते, तर थंडी ही आरोग्यासाठी उत्तम असल्याने शहरवासीयांनी व्यायामाला पसंती दिली होती. त्यामुळे शहरातील विविध मैदानावर जॉगिंग साठी शहरवासीयांची गर्दी दिसून येत होती.

नाशिक शहरात शुक्रवारी आणि शनिवारी किमान तापमानाचा पारा हा ८ ते ९ अंशापर्यंत सरला होता रविवारी तोच पारा १२.५ अंशांवर आल्यानंतरही वातावरणात थंडी जाणवत होती. नाशिक जिल्ह्यातील ओझर येथे किमान तापमान हे ९.९ तर निफाड येथे १०.८ आणि नाशिक शहरात १२.६अंश सेल्सिअस ची नोंद करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...