आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडी झाली कमी:राज्यात 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण; मराठवाडा, विदर्भासह कोकणात किमान तापमानात वाढ

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने थंडी कमी झाली आहे. रविवारी नाशिक जिल्ह्यात काही भागांत हलका पाऊस झाला. तसेच मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात किमान तापमानात वाढ झाली. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हे ढगाळ वातावरण असून दक्षिणेकडील राज्यांत आगामी तीन ते चार दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात वाढणार थंडी : डिसेंबर महिन्याची सुरुवात थंडीने होऊन दोन दिवसांतच ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ झाली. मात्र, ९ डिसेंबरपासून पुन्हा थंडी वाढण्याची ५० टक्के शक्यता असल्याचे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...