आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमानातही वाढ:विदर्भात ढगाळ वातावरण; कमाल तापमानातही वाढ, नागपूर हवामान विभागाने सांगितले

नाशिक15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ वातावरण असले तरी उन्हाची तीव्रताही वाढली होती. त्यामुळे कमाल तापमानात सरासरीपेक्षा १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ झाली. गुरुवारी पुन्हा विदर्भात उष्णतेची लाट आली असून कमाल तापमानात वाढ होणार असल्याचे नागपूर हवामान विभागाने सांगितले.

विदर्भात सध्या ढगाळ वातावरण असून काही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच सकाळी दहा वाजेपासूनच उन्हाची तीव्रता अधिक असल्याने कमाल तापमानात वाढ झाली होती. ब्रम्हपुरी, वर्धा, वाशिम, अकोला या शहरांमध्ये कमाल तापमान ४४ अंशापर्यंत पाेहोचले. चंद्रपुर, नागपूर, अमरावती, नांदेड, जळगाव या शहरांमध्ये ४३ अंश कमाल तापमानाची सेल्सिअसची नोंद करण्यात आली.

असे होते राज्यातील प्रमुख शहरातील कमाल तापमान : ब्रह्मपुरी ४४.१, वर्धा ४४.०, वाशिम ४४.०, अकोला ४४.०, चंद्रपूर ४३.८, नागपूर ४३.२, अमरावती ४३.२, नांदेड ४३.२, जळगाव ४३.०, परभणी ४२.८, यवतमाळ ४२.५, अहमदनगर ४२.०, सोलापूर ४२.०, गोंदिया ४१.५, गडचिरोली ४१.४, बुलडाणा ४१.२, औरंगाबाद ४०.३, सांगली ४०.२, पुणे ३९.६, सातारा ३९.१, बारामती ३९.०, कोल्हापूर ३८.३, नाशिक ३७.२.

बातम्या आणखी आहेत...