आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील सत्तेची स्थिरसावर झाल्याचे बघून मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाेबत अयाेध्या वारीचा निर्णय घेतला. या दाैऱ्याच्या नियाेजनाचे किंबहुना मुख्यमंत्र्यांच्या सारथ्याची जबाबदारी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांवर आली आहे. सचिव भाऊसाहेब चाैधरी व माजी विराेधी पक्षनेता अजय बाेरस्ते यांनी यापुर्वी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या दाैऱ्याचे यशस्वी नियाेजन केले. त्यामुळे आताही त्यांच्याच अनुभवाचा फायदा करून घेतला जाणार आहे.
अयोध्येला येण्याचे CMशिंदेंना निमंत्रण
दाेन दिवसापुर्वीच शिंदे यांना अयोध्या येथील प्रसिद्ध शरयू नदीवरील महाआरतीसाठी निमंत्रण देण्यात आले. यावेळी प्रमुख महंत शाशिकांतदास महाराज, महंत छबिराम दास महाराज, महंत शत्रुघन दास महाराज आदी उपस्थित हाेते. हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे व अयोध्या यांचे अतूट नाते हाेते.
म्हणून दिले निमंत्रण
ठाकरे यांचे ज्वलंत हिंदुत्ववादी विचार पुढे घेऊन जाणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आहे याचा अभिमान असल्यामुळेच निमंत्रण दिल्याचा विश्वास महंत शशिकांत दास महाराज यांनी व्यक्त केला. यासमयी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, सचिव भाऊसाहेब चौधरी, खासदार राहुल शेवाळे, माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते आदी उपस्थित होते.
चौधरी, बोरस्तेंवर विशेष जबाबदारी
अयाेध्या दाैऱ्यासाठी चाैधरी व बाेरस्ते यांच्यावर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. यापुर्वी उद्धव ठाकरे व त्यानंतर जून 2022 मध्ये आदित्य ठाकरे यांच्यासमवेत झालेल्या दाैऱ्यात दाेघांनी महत्वाची भुमिका बजावली हाेती. बाेरस्ते यांचा इव्हेन्ट मॅनेजमेंटमध्ये हातखंडा असून त्यांच्या नियाेजन काैशल्याची दखल घेत त्यांना माेठी जबाबदारी दिली गेली आहे.
याेगी व शिंदेची भेट हाेण्याची शक्यता..
राज्यात भाजपासाेबत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाची सत्ता आहे. उत्तर प्रदेश मध्ये भाजपाची सत्ता असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत. त्यामुळे याेगी व मुख्यमंत्री शिंदे यांचीही अयाेध्येत भेट हाेण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.