आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना पक्ष व धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर राज्यभरात त्याचा गजर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९ एप्रिल राेजी अयाेध्येला रामलल्लांचे दर्शन व शरयू नदीवर आरती करून शुभारंभाची तयारी सुरू केली असून या संपुर्ण दाैऱ्याची जबाबदारी नाशिकच्या विश्वासू शिलेदारांवर साेपवण्यात आली आहे. त्यात सचिव भाऊसाहेब चाैधरी, जिल्हाप्रमुख अजय बाेरस्ते यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
अजय बोरस्ते भाऊसाहेब चौधरी यांनी यापुर्वी उद्धव ठाकरे यांचे तीनदा अयाेध्या दाैरा व आदित्य ठाकरे यांचा गत जून महिन्यात झालेल्या अयाेध्या दाैऱ्याची जबाबदारी यशस्वीपणे हाताळली हाेती. अयाेध्येची खडानखडा माहिती असल्यामुळे शिंदे यांनीही ही जबाबदारी नाशिकच्या शिलेदारांवर साेपवल्यामुळे आता हा दाैरा यशस्वी करण्यासाठी माेठ्याप्रमाणात तयारी सुरू आहे.
ओळखपत्र, टी शर्ट व आराेग्याचीही काळजी
नाशिकराेड येथून अयाेध्याला १८ बाेगी असलेली एक ट्रेन आरक्षित करण्यात आली. त्यात जवळपास अडीच हजार शिवसैनिक असतील. या शिवसैनिकांना ओळखपत्र देण्यात आले असून शिवसेनेचे नाव असलेले टी शर्ट असतील. सध्या केराेना व साथराेगांचा प्रार्दुभाव लक्षात घेत त्यांच्या आराेग्याची काळजी घेण्यासाठी डाॅक्टरांचेही पथकही असेल असे बाेरस्ते यांनी सांगितले. ७ एप्रिलला सायंकाळी ट्रेन निघाल्यानंतर ८ एप्रिल राेजी रात्री अयाेध्येत शिवसैनिक दाखल हाेतील. त्यानंतर, ९ एप्रिलला रामलल्लाचे दर्शन व शरत्रू नदीवर आरती करून दाैऱ्याची सांगता हाेतील.
उद्धव यांनी केले तीनदा दाैरे
२०१४ ते २०१९ या कालावधीत जेव्हा उद्धव ठाकरे हे राज्यात भाजपसाेबत सरकारमध्ये हाेते तेव्हा शिवसेना आमदारांची घुसमट हाेत हाेती. त्यामुळे स्वतंत्र अस्तित्व दाखवण्यासाठी २४ व २५ नाेव्हेंबर २०१८ मध्ये अयाेध्या दाैरा केला गेला.
त्यानंतर १६ जून २०१९ मध्ये अयाेध्येत उद्धव ठाकरे हे आपल्या १८ खासदारासमवेत दर्शनासाठी गेले हाेते. लाेकसभेत भाजपाला बहुमत मिळाल्यामुळे शिवसेनेचे महत्व दाखवून देण्यासाठी हा दाैरा केल्याचे बाेलले गेले.
भाजपाला साेडचिठ्ठी देवून महाविकास आघाडीच्यामदतीने मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व साेडले नसल्याचे दाखवण्यासाठी ७ मार्च २०२० मध्ये अयाेध्या दाैरा केला हाेता मात्र त्यावेळी केराेनाचा नुकताच प्रार्दुभाव झाल्यामुळे उत्तर प्रदेश सरकारच्या विनंतीनुसार हा दाैरा आटाेपता घेतला गेला.
आदित्य यांच्या ऐकमेव दाैऱ्याचीही जबाबदारी
१५ जून २०२२ राेजी आदित्य ठाकरे यांच्याही दाैऱ्याची जबाबदारी चाैधरी व बाेरस्ते यांच्यासह ठाकरे यांच्या सेनेतील अन्य महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी पार पाडली हाेती. विशेष म्हणजे त्यावेळी राज ठाकरे यांचाही अयाेध्या दाैरा चर्चत असल्यामुळे आदित्य यांच्या दाैऱ्याला महत्व हाेते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.