आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अक्षय कुमार अडचणीत:मुख्यमंत्र्यांनाही हेलिकॉप्टरची सुविधा नाही, मग अक्षय कुमारला हेलिकॉप्टर कसं मिळालं, छगन भुजबळांचे चौकशीचे आदेश 

नाशिक10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अक्षय कुमारच्या अडचणी वाढण्याची शक्यता

अभिनेता अक्षय कुमारच्या नाशिक येथील हेलिकॉप्टर दौऱ्याची चौकशी होणार आहे. चौकशीचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. राज्यातील मुख्यमंत्र्यासह एकाही मंत्र्याला हेलिकॉप्टरची सुविधा सध्या मिळत नाही. मग अक्षय कुमारला नाशिक जिल्हा प्रशासनाने व्हीआयपी सुविधा कशी दिली याची चौकशी केली जाणार आहे. 'नियम डावलून अक्षय कुमारला व्हीआयपी ट्रीटमेंटचा हा प्रकार धक्कादायक आहे. ग्रामीण भाग आहे तरीही अक्षय कुमारला शहर पोलिसांचा एस्कॉर्ट कसा?, असे म्हणत छगन भुजबळ यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. 

अक्षय कुमारने चार दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील एका खासगी रिसॉर्टवर भेट दिली होती. दरम्यान यासाठी अक्षय कुमारच्या हेलिकॉप्टरला विशेष परवानगी देण्यात आली होती. अक्षय कुमारने त्रंबकेश्वरजवळील एका रिसॉर्टवर मुक्काम केला होता. राज्यातील मंत्र्यांना व्हीआयपी सुविधा मिळत सध्या मिळत नाहीयेत. मग असे असताना अक्षय कुमारला हेलिकॉप्टरसाठी परवानगी मिळाली. याच कारणामुळे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सुविधेवरून वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे अक्षय कुमारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...